चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस शेतात नेवून बळजबरी शरीरीक संबध प्रस्थापित केल्याबद्दल तीन जणाविरोधात बलात्काराचा गुन्हा चाळीसगाव शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका परिसरात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस ३ जणांनी संगनमत करून पीडित मुलीस एका दर्ग्याजवळ बोलवून तिला दुचाकीवर बसवून औरंगाबाद रस्त्यावरील एका मक्याच्या शेतात नेले. यानंते संशयित आरोपी नाना गोरख आहिरे (रा.तळवाडे ता.नांदगाव जि.नाशिक) याने बळजबरी शरीरीक संबध प्रस्थापित केले. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
संशयित आरोपी नाना गोरख आहिरे यासह दोन मित्राविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सागर ढिकले हे करीत आहेत.