चेन्नई (वृत्तसंस्था) तामिळनाडूमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तामिळनाडू सायबर सेलने एका शाळेतील शिक्षिका आणि तिच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप सेक्स व्हिडीओची मदुराई सायबर सेलच्या चौकशी सुरू केली आहे. हा व्हिडीओ एका व्यावसायिकाद्वारे शूट करण्यात आला होता. हा व्यावसायीक महिला शिक्षिकेचा प्रियकर होता. पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मदुराई सायबर सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, डीजीपी कार्यालयाकडून अश्लील कन्टेंट शेअर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पतीपासून विभक्त झालेल्या महिलेचे 2010 पासून या व्यावसायिकासोबत अनैतिक संबंध आहेत. शिक्षिकेने तीन 16 वर्षांच्या विद्यार्थ्यांना तिच्या घरी बोलवले, त्यानंतर त्यांच्याशी जवळीक साधली. तसेच त्यांच्याशी शारीरिक संबध ठेवले. चौकशीदरम्यान, व्यावसायिकाने उघड केले की, त्याने हा व्हिडीओ त्याच्या काही मित्रांमध्ये प्रसारित केला होता. यामुळे सायबर सेलने व्हिडीओ मिळालेल्या काही लोकांची चौकशी केली.
पीडित अल्पवयीन मुलांच्या तक्रारीनंतर मदुराई पोलीस ठाण्यात महिला आणि व्यवसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर सेलच्या अधिका-यांनी सांगितले की ते व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांची चौकशी करत असून आवश्यक वाटल्यास त्यांनाही अटक केली जाईल. मदुराई येथील सरकारी शाळेतील 42 वर्षीय शिक्षिका आणि तिच्या 39 वर्षीय प्रियकराला रविवारी अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत.