पिंपरी (वृत्तसंस्था) एका अल्पवयीन मुलाने युट्यूब व्हिडीओ पाहून आपल्या तीन वर्षीय चिमुकल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक पिंपरी-चिंचवड परिसरात उघडकीस आली आहे. पीडित मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब हे परराज्यातील असून पोट भरण्यासाठी ते पिंपरी चिंचवड भागात राहायला आले आहेत. पीडित मुलीचे आणि आरोपी मुलाचे आई वडील मजुरीचं काम करतात. ते दररोज कामानिमित्त घराबाहेर जातात. त्यामुळे तीन वर्षीय चिमुकलीचा सांभाळ तिचा भाऊच करायचा. दरम्यान पीडित मुलीच्या आईला कोरोना विषाणूची लागण झाल्याने त्या आपल्या मूळगावी गेल्या. त्याठिकाणी गेल्या असता, पीडित मुलीची प्रकृती बिघडली. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी औषधोपचार करून घरी पाठवलं. त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलगी आपल्या आईसह पुन्हा पिंपरी चिंचवड मध्ये परत आली. त्यानंतरही पीडित मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला पिंपरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं.
पीडित मुलगी वारंवार ‘भैय्याने मेरे साथ गंदा काम किया’ असं म्हणत असल्याने पीडितेच्या आई वडिलांचा संशय बळावला. आरोपी भाऊ वडिलांच्या मोबाईलवर अनेकदा अश्लील व्हिडीओ पाहायचा. यातूनच आरोपी भावानं ऑगस्ट महिन्यात आपल्या तीन वर्षीय सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपी भावाला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.