अमरावती (वृत्तसंस्था) अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा क्षेत्रातचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड (Yogesh Gharad) यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. वरुड शहरातील मूलताई चौकात योगेश घारड यांच्यावरती अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या घारड यांना अधिक उपचारांसाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
योगेश घारड यांच्यावर वरुड शहरातील मुलताई चौक परिसरात शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्लेखोर गोळ्या झाडून पसार झाला. घराड यांच्यासोबत असलेल्या नंदू काळे व अन्य सहकाऱ्यांनी हल्लेखोराचा पाठलाग केला मात्र तो हाती लागला नाही. राहुल तडस असे हल्लेखोराचे नाव असल्याचे आता सांगण्यात येत आहे. योगेश घारड यांच्या डाव्या मांडीला गोळी लागली असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले.