मुंबई (वृत्तसंस्था) भाजप संघर्ष करणारी पार्टी आहे. त्यामुळं आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
पुण्यात मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी केली असेल. मात्र राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनातही हीच भावना आहे. पण भाजपा ही संघर्ष करणारी पार्टी आहे. आम्ही अशी मागणी करण्याचं काहीच कारण नाही. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय हा राज्यपाल घेतात. मात्र आम्ही लढायला तयार आहोत, असं फडणवीस यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या हे झेड प्रोटेक्टी आहेत. आपण पोलीस ठाण्यात येत असल्याचं त्यांनी पोलिसांना कळवलं होतं तरीही हल्ला होतो याचा अर्थ पोलिसांचं या हल्ल्याला समर्थन आहे किंवा पोलीस नाकाम झाले आहेत. पोलीस झेड प्रोटेक्टीला सुरक्षा देऊ शकत नसतील तर इतरांच काय? असा सवाल करतानाच पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. ही मागणी माझी असणार आहे. यासारखं झुंडशाहीचं राजकारण मी पाहिलं नव्हतं. पोलिसांनी कळवून ही त्यांनी सोमय्यांना गुंडाच्या हवाली केलं. जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो ही घटना मात्र दुर्देवी आहे. आम्ही केंद्र सरकारला सांगणार आहोत आणि विभागाच्या सचिवांनाही सांगणार आहोत. जे पोलीस झेड प्रोटेक्टिची सुरक्षा करत नसतील तर आम आदमीचं काय? असा सवालही त्यांनी केला.
मग पाकिस्तानाच हनुमान चालिसा म्हणायचा का?
राणा दाम्पत्य हनुमान चालीसा म्हणणार होते. हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाहीतर काय पाकिस्तानात म्हणायची काय?, असा सवाल फडणवीस यांनी केला. एका महिलेला पोलीस कस्टडीत ठेवण्यात आलं हे योग्य नाही, असंही ते म्हणाले.