धरणगाव (प्रतिनिधी) : तेली समाजाचे भुषण असलेल्या संत श्री संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकोबांच्या गाथेचे पुनर्लेखन करुन गाथा संजीवन करुन ठेवली आहे. त्यांनी केलेले हे कार्य अलौकीक असून त्यांनी गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श उभा केला आहे असे प्रतिपादन साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी यांनी केले. संताजी महाराज यांच्या ४०० व्या जयंती निमित्त ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.वसंतराव भोलाणे होते. महाराजांनी आपल्या तेलाच्या घाण्याला देव मानून घाण्याचे अभंग रचले. त्यातून समाज प्रबोधन केले. संताजी महाराज यांचे जीवन कार्य सांगून, तेली तितुका मेळावा समाज धर्म वाढवावा ! असा संदेश चौधरी यांनी या निमित्ताने दिला.
श्री संताजी तिळवण तेली पंच मंडळ सुभाष दरवाजा विभागा तर्फे रविवारी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. सर्व समाज बंधू-भगिनींनी नव्याने साकार करण्यात आलेल्या संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. लवकरच आ. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून समाज भवनाचे निर्माण केले जाणार आहे. त्याबाबत पंचमंडळाने चर्चा केली.
समारोपाला आत्माराम पांडुरंग चौधरी यांच्याकडून उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमास समाज अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव संतोष चौधरी, सदस्य पंढरीनाथ चौधरी, डोंगर चौधरी, भरत चौधरी, अशोक व्यवहारे, रतिलाल चौधरी, अनिल चौधरी, चेतन चौधरी, एकनाथ चौधरी, प्रल्हाद चौधरीसह समाजातील बंधू, भगिनी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.