धरणगाव (प्रतिनिधी): श्री व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे शहराच्या चारही दिशांना असणाऱ्या स्मशानभूमी परिसरात आधुनिक सुविधायुक्त लोखंडी “अस्थी (जीव) संरक्षक लॉकर”चे लोकार्पण विविध समाजाचे अध्यक्ष, मान्यवर आणि पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत केले, व्हा. चेअरमन अजय वाणी, संचालक प्रवीण येवले, व्यवस्थापक किरण वाणी, सुधाकर येवले, ललित येवले, आयुष बागड तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. नागरिकांच्या सोयीसाठी तसेच धार्मिक परंपरांचा आदर राखत ही लॉकर सुविधा बसविण्यात आल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठोबा नामदेव माळी होते. याप्रसंगी गुलाबराव वाघ, जीवनसिंह बयस, व्ही. टी. माळी, भानुदास विसावे, सुनील जावरे, राजेंद्र पवार, कैलास माळी, नितीन चौधरी, आर. डी. महाजन, राजेंद्र जावरे, गणेश माळी, बाबुलाल पाटील, गणेश मराठे, उमेश महाजन, देविदास कुंभार, दशरथ बापू, सुरेश आप्पा, रविंद्र वाघ, गोविंद पुरभे, राजेंद्र वाघ, अजय वाघ, नंदा महाजन, युवराज माळी यांसह प्रतिष्ठित मान्यवर व समाजसेवकांच्या हस्ते लॉकरचे उद्घाटन करण्यात आले.
लोकार्पण प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की जीव व अस्थी विसर्जनापूर्वी काळजीपूर्वक आणि सुरक्षितरीत्या ठेवण्यासाठी हे लॉकर अत्यंत उपयुक्त ठरेल. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा मिळावी हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने बसविण्यात आलेल्या या लॉकर पेटीत नऊ कप्पे तयार करण्यात आले असून सुरक्षितता, स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही सेवा शहरातील सर्वधर्मीय नागरिकांसाठी खुली आहे.
समाजोपयोगी सुविधेच्या उभारणीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल श्री व्यंकटेश नागरी पतसंस्थेच्या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. लोकार्पण कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण वाणी यांनी केले असून आभार प्रदर्शन सुनील चौधरी यांनी मानले.













