जळगाव (प्रतिनिधी) घर खाली करुन दे म्हणत दोघ भावंडांना लोखंडी फायटरसह धारदार पट्टी सारख्या वस्तूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना शहरातील रामभाऊ प्रभुदेसाई चौकातील एका गल्लीत घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या अभी कुलकर्णी व यश जैन यांच्यासह अज्ञातांविरुद्ध – गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बळीराम पेठेत निलेश राजेंद्रसिंग पाटील (वय ४३) हे वास्तव्यास आहे. दि. २० रोजी त्यांचा भाऊ यशपाल राजेंद्रसिंग पाटील हे कचरा फेकण्याकरीता रामभाऊ प्रभुदेसाई चौकाजवळील गल्लीत गेला होता. यावेळी त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने निलेश पाटील हे तेथे गेले असता, अभी कुलकर्णी व यश जैन यांच्यासोबत असलेल्या काही जण हे यशपाल पाटील यांना मारहाण करीत होते. निलेश पाटील यांनी जाब विचारल्यानंतर अभी कुलकर्णी याने त्याच्या हातातील फायटरने त्यांच्या नाकावर मारहाण केली. यावेळी एकाने भाऊचे घर खाली करुन दे नाहीतर तुम्हाला पाहून घेवू अशी धमकी देत धारदार लोखंडी पट्टीने निलेश पाटील यांच्या डोक्यावर वार करीत जखमी केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर निलेश पाटील यांनी शहर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित अभी कुलकर्णी (रा. बळीराम पेठ) व यश जैन याच्यासह अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास इंदल जाधव हे करीत आहे.
















