बोदवड (प्रतिनिधी) झारखंड येथील सम्मेद शिखरजी या जैन धर्मीयांच्या तीर्थस्थळाला झारखंड सरकारने पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बोदवड येथे जैन धर्मियांचा मूक मोर्चा पावित्र्य भंग करणारा असल्याने या निर्णयाविरोधात सकल जैन धर्मियांनी तहसिलवर मूक मोर्चा नेऊन निवेदन दिले.
सदर निर्णय रद्द करून या पवित्र स्थानाला जैन धर्मीयांचे तीर्थस्थळ घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली.आज सकाळी व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून साडेबाराच्या सुमारास जैन बोर्डिंग पासून मोर्चा सुरू होऊन जैन मंदिरासमोरून शिवद्वार मधून गांधी चौक, आंबेडकर चौक ,महात्मा फुले चौक मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला आणि नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी यांनी देण्यात आले. सम्मेद शिखरजी हे जैन समाजाचे सर्वोच्च स्थान असून ही मोक्षभूमी आहे.
या पवित्र भूमीला पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे येथील पावित्र्य धोक्यात आले आहे. पर्यटक जोडप्यासोबत पादत्राणे घालून येतील. कोल्ड्रिंक, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल कुठेही टाकतील. कोणत्याही बंधने नसल्याने मदिरापान करतील, मांसाहार करतील, शिखर मार्गावर सरकार हॉटेल, लॉजिंग, व्यावसायिक दुकानांना परवानगी देईल, परिणामी रात्री उशिरापर्यंत पर्यटकांची वर्दळ सुरू राहील.त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहणार नाही, असे जैन श्री संघांच्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अध्यक्ष अभय बरडिया, उपाध्यक्ष संजय कोटेजा ,अशोक जोगड, परीष श्रीश्रीमाळ, दिपक झांबड, विकास कोटेजा, नंदुलाल छाजेड ,नगराध्यक्ष आनंदा पाटील गोलु बरडिया, मनोज कोठारी ,विनायक बाफना, मोनु समदडिया, प्रशांत चोपडा, आशोक झांबड ,नगरसेविका पुजा बरडिया, कविता बागरेजा, साधना बरडिया, माया कोठारी ,पुष्पा कोठारी, मोना खिवसरा ,गिरिष्मा कोटेजा ,पुजा कोठारी, मधु खिवसरा, मिनाक्षी बाफना, जयश्री समदडिया, संपना चोरडिया, प्रियंका श्रीश्रीमाळ ,शिवानी बरडिया,कल्पना बरडीया, प्रिया बाफना, संगीता जैन. यांचेसह जैन धर्मीय उपस्थित होते.मूक मोर्चा नंतर व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडण्यात आली.