बोदवड (प्रतिनिधी) छत्रपती संभाजी महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे (नियोजन विभागाअंतर्गत महाराष्ट्राची स्वायत्त संस्था) व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल),पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा अभ्यासक्रम सॉफ्ट स्किल, डिजिटल कौशल्य विकसित करण्यास उपयोगी असून या प्रशिक्षण कार्यक्रमाचा सदुपयोग करून घ्यावा, असे मत सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ पत्रकार महेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अभ्यासक्रमाचे पुस्तके वितरण प्रसंगी ते बोलत होते. सारथीतर्फे मोफत सहा महिन्यांचा कॉम्प्युटर डिप्लोमा मराठा, मराठा, आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेअर गटाच्या युवांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमातील पहिली बैचचे प्रशिक्षण १० फेब्रुवारी पासून प्रिया कम्प्युटर अकॅडमी बोदवड येथे सुरू झाले आहे .यातील २१ प्रशिक्षणार्थींना इंग्लिश लँग्वेज स्कील्स, कम्युनिकेशन स्कील्स, अँड सॉफ्ट स्कील्स या पुस्तकाचे वितरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दिनेश पाटील, प्रीती पाटील उपस्थित होते.














