TheClearNews.Com
Tuesday, June 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनातर्फे मदतीचा हात !

‘उभारी’ उपक्रमाच्या माध्यमातून शासन पाठीशी खंबीरपणे उभे : ना. गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 28, 2023
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. कुटूंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटूंब असह्य होते. विशेषत: शेतकरी बांधवांच्या कुटूंबियांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी या कुटूंबांच्या ‘उभारी’ साठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे. या भावनेतूनच ‘उभारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अशा कुटुंबांच्या पाठिशी शासन व प्रशासन खंबीरपणे पाठीशी असल्याचे सांगून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील २ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये मदतीचा धनादेश शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे प्रदान करण्यात आला. तसेच पशुहानी झालेल्या ६ व्यक्तीना शासकीय अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.

कोव्हिड-१९ मुळे मृत पाडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास ५० लाखाचे सानुग्रह मंजूर !

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालय जळगाव यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले कर्मचारी कै.नाना लक्ष्मण वाघ (कोतवाल) राहणार शिरसोली यांचा कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य पार पाडताना कोरोना विषाणू संसर्गाने दि. २८ मार्च २०२१ रोजी मृत्यू झाला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून ५० लाखाचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. आठवड्या भरात कै. नाना लक्ष्मण वाघ यांच्या नामनिर्देशित व्यक्तीस/ कायदेशीर वारसास ५० लाख रुपये इतकी रक्कम सानुग्रह सहाय्य म्हणून धनादेशाद्वारे प्रधान करण्यात येणार आहे

जळगाव तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना काल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासकीय मदतीने वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे, जि.प. सदस्य पवन सोनवणे, दुध संघ संचालक रमेश पाटील,नंदलाल पाटील, अर्जुन पाटील, जना आप्पा कोळी , शिवराज पाटील, रवि कापडणे, सचिन पवार, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, अजय पाटील, तहसीलदार नामदेव पाटील, महसूल सहाय्यक सौ. जयश्री मराठे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन पाटील यांनी केले. तर आभार महसूल सहाय्यक सौ. जयश्री मराठे यांनी मानले. यानंतर मृत्यूला कवटाळलेल्या 2 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये असे धनादेश वाटप करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पात्र वारसांना संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. याच कार्यक्रमात पशुहानी झालेल्या तालुक्यातील ६ पात्र धारकांना धनादेश वाटप करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
Next Post

आमदगाव येथील तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने शेतातच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक….देवकर अप्पा ठरले बाजीगर !

December 4, 2021

रेल्वेच्या शौचालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; भुसावळ लोहमार्ग पोलिसात अज्ञात प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल !

September 26, 2024

‘भोंग्यांच्या’ आवाजावरून वाद ; पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती

April 16, 2022

मनसे नेते अमित ठाकरेंचा ताफा अडवला ; संतप्त मनसैनिकांनी फोडला टोलनाका !

July 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group