जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत असलेले शिक्षण सभापतींच्या स्वीय सहाय्यकांच्या दालनातील स्लॅब अचानक कोसळल्यामुळे सुदैवाने दोघेजण बचावले आहेत. दरम्यान, कक्षाच्या दुरुस्तीबाबत ऑक्टोबर महिन्यातच शिक्षण विभागाकडून संबंधितांना पत्र देण्यात आले होते.
आज दुपारी जिल्हा परिषद शाळा जुन्या इमारतीत असले शिक्षण सभापतींच्या स्वीय सहाय्यकांच्या कक्षातील स्लॅब अचानक कोसळला यावेळी शिक्षण सभापती यांचे स्वीय सहाय्यक कांतीलाल पाटील आणि अन्य एक जण सुदैवाने या अपघातातून थोडक्यात बचावले. दरम्यान, या घटनेमुळे जुन्या इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. तर कक्षाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाने आक्टोंबर महिन्यातच पत्रव्यवहार करून देखील दुरुस्ती न केल्यामुळंचं ही परिस्थिती ओढावल्याची चर्चा आहे.