जळगाव (प्रतिनिधी) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मटन मार्केटच्या मागे नेरी नाका परिसर येथे गेल्या अनेक वर्षापासून झोपडपट्टी असून या ठिकाणी भिल्ल समाजाचे लोक वास्तव्यास आहे. परंतु, गेल्या आठ दहा वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत झोपड्या अतिक्रमण करीत वास्तव्यास आलेल्या आहेत व या ठिकाणी अवैध दारू, विक्री हातभट्टी दारू, गांजा विक्री, चरस सारखे आमली पदार्थ, गावठी कट्टे विक्री सारखे व्यवसाय या ठिकाणी चालू झालेले आहे.
जळगाव शहराच्या मध्य भागी असलेले मटन मार्केट तसेच 200 मीटरवर असलेले MSEB चे मुख्य कार्यालय असून या ठिकाणी संपूर्ण शहरातून लोक, महिला या ठिकाणी येत असतात. तसेच सदर रोड हा नेरी नाका – बेंडाळे चौक रोड ते नेरी नाका, पांडे चौक या रोडला जोडणारा असल्याने अनेक पादचारी किंवा दुचाकी वाले या ठिकाणाहून वापरत असतात.
बाजारपेठेत दरोडे
दरम्यान, गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणची गुन्हेगारी उदयास आली असून पिंट्या भाई गॅंग सक्रिय झाली आहे. जळगाव बाजारपेठेतील विविध दरोड्यांच्या गुन्ह्यांमध्ये पिंट्या भाई यांच्या सभासदांचा सहभाग आढळून आला आहे. तसेच गेल्या काही महिन्यात या रस्त्याने वापरणाऱ्यांवर प्राणघातक हल्ले, लुटमार जबरी चोरी, इ. घटना देखील वाढलेले आहेत.
अमली पदार्थांची सर्रास विक्री
या ठिकाणी जवळपास सहा गावठी दारूच्या मोठ्या भट्ट्या असून मोठ्या प्रमाणावर दारूचे हातभट्टीचे उत्पन्न घेतले जाते. संपूर्ण शहरात याचा पुरवठा केला जातो, तसेच गांजा इत्यादी देखील आमली पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतात व मोठ्या प्रमाणावर गंजळी लोक या ठिकाणी येऊन गांजाचे सेवन करीत असतात. एवढेच नाहीतर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता देखील पसरवत असतात.
विविध अवैध दारू विक्रीचे गुन्हे
सदर संपूर्ण झोपडपट्टी ही त्या ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री, हातभट्टी विक्री, गांजा इत्यादी अमली पदार्थ यांची सर्रास खुल्या पद्धतीने विक्री करते. मोठ्या प्रमाणावर चोरीच्या दुचाकी इत्यादी विक्री किंवा पलटी करवण्यासाठी किंवा त्या भंगार मध्ये विकण्यासाठी येत असतात, यांची मोड होत असते. लोखंडाच्या साह्याने पांचाळ लोकांमार्फत तलवार, कोयते इत्यादी गुन्हेगारी याच्यासाठी वापरले जाणारे अवजार सर्रास विक्रीसाठी उपलब्ध असतात. गावठी कट्टे देखील या ठिकाणी उपलब्ध असतात.
पोलिसांवरील हल्ले
या ठिकाणी रहिवास करीत असलेला बबलू सोनवणे नामक गुंड येणे पोलीस या ठिकाणी आले असता त्यांच्यावर रिवाल्वरने ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे, यामुळे त्यांची हिंमत अधिक वाढत आहे.
हप्ते खंडणी वसुली
या ठिकाणी छोटे-मोठे असे अनेक व्यवसाय आहेत. यासह सदर रोडवर मच्छिमार लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तसेच SAWMILL देखील आहेत. ही टोळी जाऊन प्रत्येकाकडून वाटेल तेव्हा खंडणी हप्ता स्वरूपात वसूल करते. जर यांना पैसे नाही दिले तर हे रात्री त्याच ठिकाणी दरोडा टाकतात किंवा त्या व्यापाराची रस्त्यात पैसे घेऊन जात असताना लूटमार करतात व दहशत निर्माण करतात.
स्थानिक रहिवाशांचे निवेदन
या त्रासाला कंटाळून आता दीक्षित वाडी, वानखेडे सोसायटी, जोशी पेठ, भवानी पेठ, भोई गल्ली, इत्यादी परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत सदर अनाधिकृत झोपडे उठवण्याबाबत पवित्रा उचलला आहे. याबाबत जळगाव मनपा आयुक्त तसेच जळगाव पोलीस अधीक्षक यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. आता जळगाव मनपा विभाग यावर कारवाई करणार का ?, याकडे आता लक्ष लागून आहे. तसेच या अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस प्रशासन कारवाईचे ड्रिल चालवेल का ?, याकडे देखील आता लक्ष लागून आहे.