मुंबई (वृत्तसंस्था) माझं उद्धव ठाकरे यांना आव्हान आहे की, तात्काळ त्यांनी त्यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुरमुक यांना पाठिंबा द्यावा. पक्षाचे वाताहत होत चालली आहे, लोक पक्ष सोडत आहेत, आमदार पक्ष सोडत आहेत, त्यामुळे यात थोडी जरा चूक झाली तर खासदारांचा मोठा गट त्यांच्या निर्णयाच्या विरोधात मतदान करेल, असे सूचक विधानही भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आज लोकसभा खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुरमुक यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यांच्या भूमिकेचे स्वागत गिरीश महाजन यांनी केलं. गिरीश महाजन पुढे म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता तरी निर्णय घ्यावा आणि दौपदी मुरमुक यांना पाठिंबा जाहीर करावा. मला असं वाटतं की ज्या शिवसेनेसोबत आम्ही पंचवीस तीस वर्षे संसार केलेला आहे. त्यांचा अशा पद्धतीने ऱ्हास होत चाललेला आहे. आम्हालाही वाईट वाटतं पाहून आता तरी त्यांनी योग्य निर्णय घ्यावा. आता उगाच संजय राऊत काय म्हणतात अजून कोणी काय म्हणताय ते ऐकण्या पेक्षा स्वतःच्या मनाने सर्वांच्या भावनांचे कदर करून खासदारांची सुद्धा त्यांनी हा निर्णय घेण्याची योग्य वेळ आहे.
आता निर्णय घेतला योग्य निर्णय घेतला तर फारच बरं आणि दुर्दैवाने अजून कुणाचा ऐकून निर्णय घेतला नाही, तर मोठ्या प्रमाणात खासदारांमध्ये फूट पडेल, मोठ्या संख्येने टू थर्डपेक्षाही जास्त या निर्णयाच्या विरोधात मतदान करतील, असा इशाराच त्यांनी दिला आहे. मी आधीपासून उद्धवजींना सांगतोय तुमच्या माध्यमातूनही सांगतोय की एखाद्या माणसाचं किती ऐकावं. त्या माणसामुळे सर्वचे सर्व 40 ते 50 लोक गेले आहेत. त्यासाठी अनेक वेगळी कारण आहेत. पण महत्त्वाचं कारण हे एकमेव कारण आहे ज्येष्ठ नेते सुद्धा सांगत आहेत. हा एकटा माणूस सर्वेसर्वा आहे का? पक्ष हा खाली खाली चाललेला आहे. एवढा मोठे आमदार स्प्लिट झालेले आहेत. एक माणूस सांगतो आहे आपण खाली खाली चाललो आहोत की आता जमिनीखाली जायची वेळ आलेली आहे, असेही महाजन म्हणाले.