औरंगाबाद (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरे यांचा अन्य नेत्यांवर विश्वास नसेल, तर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी रश्मी वहिनींकडे (Rashmi Uddhav Thackeray)द्यावी, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil)म्हणाले होते. हाच धागा पकडत आता शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर रश्मी ठाकरे राज्याचं नेतृत्व करु शकतील, असं म्हटले आहे.
“उद्धव साहेबांचा आदेश असला तर काहीही होऊ शकतं. मला वाटतं उद्धवसाहेब रश्मी ताईंवर जबाबदारी देऊ शकतात. आता त्या सामनाच्या मुख्य संपादक म्हणून काम करत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने जनतेपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे, हे रश्मीताईंना चांगल्या प्रकारे माहिती आहे. राज्यात एक आदर्श महिला म्हणून त्यांचं नाव आहे”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
अब्दुल सत्तार म्हणाले, “बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजी आणि त्यानंतर रश्मी ठाकरे उत्तम प्रकारे काम करु शकतील. रश्मी ठाकरे आज पदड्यामागे काम करत आहेत. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असतं. कारण त्या उद्धव साहेबांच्या, आदित्यसाहेबांच्या सोबत राहतात. उद्धवजी, आदित्य साहेब कसं काम करतात, या सर्वांच्यापेक्षा एक महिला म्हणून त्यांचं नियोजन, महिला सक्षमीकरणासाठी तसंच बळकटीकरण काय करायला हवं, याविषयी त्यांचं चिंतन आहे.”
“महिलांना फक्त चूल आणि मुल न करता, त्यांना सक्षम कसं करायला पाहिजे, यासाठी रश्मीताईंचं मोठं काम आहे. म्हणून मला वाटतं, उद्धवसाहेब त्यांच्यावर जबाबदारी देऊ शकतात. आता त्या सामनाच्या मुख्य संपादक उत्तम काम करत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे, हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे”, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.
















