TheClearNews.Com
Sunday, November 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समाजसेवेसाठी जीवन समर्पित करणारे समाजसुधारक, राष्ट्रपिता-तात्यासाहेब ज्योतिबा फुले !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2023
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

महान क्रांतिकारी, भारतीय विचारक, समाजसेवी, लेखक, कवी, शाहीर, समतानायक, दार्शनिक, क्रांतीसुर्य, राष्ट्रपिता, महात्मा, सत्यशोधक तात्यासाहेब ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली पुण्यात झाला. ज्योतिबाच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते. ज्‍योतिबा केवळ एक वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते. ज्योतिबा यांचा पूर्ण कुटुंब फुलांच्या व्यवसाय करीत असल्याने त्यांच्या कुटुंबाला फुले या नावाने ओळखले जात असे.

ज्योतिबाने काही काळ मराठीत अभ्यास केला नंतर शिक्षण सुटलं आणि नंतर वयाच्या २१ वर्षात त्यांनी इंग्रजीत सातवी या वर्गाचा अभ्यास सुरू केला. महात्मा फुले यांचा विवाह १८४० साली सावित्रीबाई यांच्यासोबत झाला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले त्यांच्या सोबत रहात असत. त्यामुळे सामाजिक कार्यात त्यांचा सुध्दा तेवढाच महत्त्वाचा वाटा दिसून येतो. सावित्रीबाई फुले भारतातील पहील्या महीला शिक्षणाच्या जनक होत्या. स्त्रियांची अवस्था सुधारण्यासाठी आणि समाजात त्यांना ओळख प्रदान करण्यासाठी त्यांनी १८४८ मध्ये एक शाळा उघडली. ही शाळा देशातील पहिली अशी शाळा होती जी मुलींसाठी उघडण्यात आली होती. मुलींना शिक्षण देण्यासाठी शिक्षिका नसल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला या योग्य बनवले.

READ ALSO

वकिलाची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 2 ते 8 नोव्हेंबर 2025 !

काही लोकांना सुरुवातीपासूनच त्यांच्या कामात अडथळे घातले. लोकांनी त्यांच्या वडिलांवर दबाव टाकून त्यांना पत्नीसह घरातून बाहेर हाकवले तरी ज्‍योतिबाने हिंमत सोडली नाही आणि मुलींसाठी तीन-तीन शाळा उघडल्या. गरीब आणि निर्बल, उपेक्षित, दुर्लक्षित आणि वंचित वर्गाला न्याय देण्यासाठी ज्योतिबाने ‘सत्यशोधक समाज’ स्थापित केले, त्यांच्या समाज सेवेने प्रभावित होऊन १८८८ मध्ये मुंबईच्या एक सभेत त्यांना ‘महात्मा’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले. ज्योतिबा यांनी ब्राह्मण-पुरोहित यांच्या मदतीविना विवाह-संस्कार आरंभ करवले आणि मुंबई हायकोर्टाकडून मान्यता मिळवली. ते बाल-विवाह विरोधी आणि विधवा-विवाहाचे समर्थक होते. त्यांनी दुर्लक्षित व उपेक्षितांच्या प्रगतीसाठी अनेक कार्य केले. त्यांनी मुलांचे घरात पालन-पोषण केले. परिणामस्वरूप त्यांना जातीतून बहिष्कृत देखील केले. ज्योतिबा फुले आणि त्यांचं संघटन सत्‍यशोधक समाजाच्या संघर्षामुळे सरकाराने एग्रीकल्‍चर एक्‍ट पास केले.

महात्मा जोतीरावांनी शिक्षणासोबत प्रबोधनाचे काम सुरू केले. मेळा, जलसे, नाटके उभे करून समाजप्रबोधन करू लागले. तृतीय रत्न हे नाटक व शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक त्यांनी लिहिले. शेतकरी व समाजामध्ये जागृतीचं काम सुरू केले. जातिभेद निर्मुलन व अस्पृश्यता निर्मुलनाचं काम जोतीरावांनी सुरू केलं. अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. अनाथ बालकांसाठी बाल सुधारगृह चालवले. संकटात सापडलेल्या काशीबाई नावाच्या ब्राह्मण समाजातील महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं.

तिला आधार दिला. तिला झालेलं मूल पुढे दत्तक घेतलं, त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि त्यास डॉक्टर बनवलं. भ्रूणहत्या, बाल सुधारगृह अशी कामे सुरू केल्यामुळे सनातनी मंडळींचा विरोध प्रखर वाढलेला होता. परंतु विरोधाला न जुमानता जोतीरावांचे कार्य अविरतपणे चालूच होते. केशवपनासारखी वाईट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. विधवा पनुर्विवाहाला उत्तेजन दिले. इंग्रजी आपली जागतिक भाषा, ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी शिकण्याला प्रोत्साहन दिले. महात्मा फुले यांनी समाजामध्ये पसरलेल्या अज्ञान व गरिबीचं कारण हे धर्मातच असल्याचे ओळखले होते. धर्माने स्त्री व शूद्रांना वेद वाचण्याचे अधिकार नाकारले होते. तुकोबांनी जसे अभंग लिहिले तसे जोतीबांनी अखंड लिहिले. सिंधू संस्कृतीचा शोध १९२५ मध्ये लागला परंतु त्यापूर्वीच १८५० ते १८९० या कालखंडात भारतीय मूळ संस्कृती सिंधू संस्कृती ही अतिशय विकसित व प्रगत असलेली कृषी संस्कृती आर्यांनी कशी उध्वस्त केली याचं यथार्थ वर्णन जोतीरावांनी आपल्या अखंड मध्ये नमूद केले आहे.

चार्वाक, बुद्ध, महावीर, कबीर, बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, तुकाराम यांच्याप्रमाणे जोतीबांनी धर्मचिकित्सा सुरू केली होती.

आमच्या देशीचे अतूलस्वामी वीर । होते रणधीर । स्मरू त्यास ॥ धृ ॥ बळीस्थानी आले शूर भैरोबा । खंडोबा – जोतीबा । महासुभा ( म्हसोबा ) ||१|
सदगुणी पुतळा राजा मूळ बळी । दसरा दिवाळी । आठविती || २ || क्षेत्रिय भार्या इडापीडा जावो । बळी राज्य येवो । अशा कां बा म्हणती?३॥
आर्यभट आले । सूवर्ण लुटीले । क्षेत्रीदास केले । बापमत्ता ॥४ ॥
वामन का घाली बळी रसातळी ।
प्रश्न जोती माळी । करी भटा ॥५ ॥

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचा शोध या देशात सर्वप्रथम महात्मा जोतीराव फुले यांनीच घेतला. इ.स. १८६९ ला रायगडावर जाऊन सर्वप्रथम जोतीराव फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. समाधीची जागा साफसूफ करून, धुवून त्यावर फुले वाहिली. समाधीचं पूजन केले. पुण्यामध्ये १८७० ला आपल्या सहकाऱ्यांसोबत भव्य शिवजन्मोत्सव सुरू केला. कुळवाडी भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रदीर्घ पोवाडा लिहून प्रकाशित केला. यातूनच प्रेरणा घेऊन गुरूवर्य कृष्णराव केळूस्कर यांनी शिवरायांवरील मराठीतील पहिले शिवचरित्र लिहून प्रकाशित केले.

थोडक्यात जगातील पहिली शिवजयंती सुरू करण्याचा मान जोतीबांना जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वैदिक व्यवस्था झुगारून देत २४ सप्टेंबर १६७४ रोजी अवैदिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करून घेतला. सर्व विधी ब्राह्मणेत्तरांकडून पार पाडले. मदारी मेहतर या मुसलमान व्यक्तीने राजसिंहासन साफसूफ करून त्याचे पूजन केले. बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिल्याची ही ऐतिहासिक घटना. या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन महात्मा जोतीबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याच माध्यमातून सत्यधर्माची घोषणा केली. सत्यधर्मात एकूण ३३ कलमे आहेत. जोतीबा – सावित्रीस मूलबाळ नव्हते. तेव्हा जवळच्या नातेवाईकांनी दुसऱ्या लग्नाचा आग्रह धरला. यावर सावित्रीमध्ये दोष असेल तर मी दुसरे लग्न करेन ; पण जर माझ्यात दोष आढळला तर तुम्हाला सावित्रीचे दुसरे लग्न लावून द्यावे लागेल. अशी अट घातल्यामुळे पुन्हा कोणी जोतीरावास दुसऱ्या लग्नाचा आग्रह केला नाही. एक आदर्श पती म्हणून जोतीराव जगले.

भारत देशात मुला – मुलींना शिक्षण घेण्याचा अधिकार महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी मिळवून दिला. जोतीबा एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांची साहित्यसंपदा प्रचंड मोठी आहे. तृतीयरत्न हे १८५५ च्या सुमारास जोतीरावांनी लिहिलेलं मराठी भाषेतील पहिले नाटक होय. याचाच अर्थ जोतीराव हे मराठी भाषेतील आद्य नाटककार होते. गावातील ब्राह्मण जोशी शेतकरी कुटुंबास कसं फसवतो यावर हे नाटक आधारित आहे. ‘ब्राह्मणांचे कसब’ , ‘शेतकऱ्याचा आसूड’ , सार्वजनिक सत्यधर्म’ , अशा महत्वपूर्ण ग्रंथाची निर्मिती जोतीबांनी केली. जोतीबांकडे वडिलोपार्जित श्रीमंती होती. तसेच त्यांनी ‘पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनी’च्या नावाने एक बांधकाम कंपनीही सुरू केलेली होती. या माध्यमातून आलेला पैसा, वडिलोपार्जित संपत्ती, देणग्या हा सर्व पैसा त्यांनी शिक्षण आणि समाजकार्यावर खर्च केला. महात्मा जोतीराव फुले पुण्यात राहत असताना त्यांच्या घराचा क्रमांक ३९५, गंजपेठ असा होता. फुलेंचं तत्वज्ञान ज्या घरात जन्माला आले ती चौकट भारतात निर्माण व्हावी यासाठी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार करताना त्यात ३९५ कलमे घातली. एवढे महात्मा फुलेंचे महत्व आहे.

फुले दाम्पत्यांमध्ये समाज सुधारणेचे संपूर्ण गुण पहायला मिळतात. महात्मा फुले सामाजिक प्रबोधनकार, भारतीय सामाजिक कार्यकर्ते, महान विचारवंत, समाजसुधारक, साहित्यिक, शाहीर, उत्कृष्ट लेखक, कवी, स्त्रियांना व समाजातील लोकांना शिक्षीत करने, जातीय व्यवस्थेचे निर्मुलन इत्यादी अनेक महान कार्याने आज महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या सन्मानाने महात्मा फुलेंना ओळखले जाते. त्यामुळेच आज संपूर्ण भारत त्यांच्या कार्यापुढे नतमस्तक होतो. आज महाराष्ट्रसह भारतात शिक्षणामध्ये जी काही सुधारणा, आमुलाग्र बदल व विविधता दिसून येते त्यांचे संपूर्ण श्रेय फुले दाम्पत्यांना जाते. अशा या महान कर्ते समाजसुधारकाचे २८ नोव्हें, १८९० रोजी निधन झाले.

▪️संकलन – राजेंद्र वाघ
राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, धरणगाव जि.जळगाव.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

वकिलाची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

November 2, 2025
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 2 ते 8 नोव्हेंबर 2025 !

November 2, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 नोव्हेंबर 2025 !

November 1, 2025
जळगाव

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा मदतीचा हात !

October 31, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 ऑक्टोबर 2025 !

October 31, 2025
जळगाव

सामाजिक परिवर्तनाचा वारसा समृद्ध करु या ! – डॉ. फडणवीस

October 30, 2025
Next Post

नंदुरबार ते खांडबारा रस्त्यावर कारचा भीषण अपघात ; यात्रेला जाणारा तरुण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप महानगरच्यावतीने रॅपिड अँटिजन-कोविड टेस्टचे शिबिर !

April 24, 2021

तलाठीला धक्का देत अवैध वाळूचे डंपर पळविले ; दोघांविरुद्ध गुन्हा !

March 14, 2022

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा : सुप्रिया सुळे

October 16, 2020

जळगावात अज्ञान चोरट्यांनी लंपास केली कार !

October 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group