जळगाव (प्रतिनिधी) शहरात शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या बांधकामाचा मार्ग लवकरात लवकर मार्गी लागावा आणि शिवाजीनगर वासियांची लांबच लांब होणारी फरपट थांबवावी, तसेच अमृत योजना आणि मलनिस्सारण योजनेच्या नावाखाली शिवाजीनगर प्रभागातील रस्त्यांची जी दुर्दशा झालेली असून रस्त्याची तसेच गटारीची कामे लवकरात लवकर मार्गी लावावी, असे निवेदन शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल यांनी महापौर जयश्रीताई महाजन यांना दिले आहे.
तसेच गेल्या सत्ताकाळात काही अ शुभचिंतकांनी एका बांधकाम व्यवसायीकासोबत पैशांचा गैरव्यवहार करून शंभर वर्षे जुन्या सुलभ शौचालय डीपी रोडच्या नावाखाली पाडण्यात आले आणि तेथील नागरिकांची गैरसोय होईल अशा ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. तसेच या गैरकारभारात आपण लक्ष घालून येथील गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून द्यावा,
गेल्या सत्ताकाळात शिवाजीनगर वासियांना खूपच हालअपेष्टा आणि अवहेलना सहन कराव्या लागल्या आणि आता तीच शिवाजीनगर वासी आपल्याकडे खूप आशा आणि अपेक्षेने पाहात आहेत. तरी आपण आपल्या हक्काच्या शिवसेनेच्या सत्ताकाळात त्यांना योग्य तो न्याय मिळवून द्याल. असे शिवाजी नगर शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल यांनी निवेदनात म्हंटले आहे.
महापौर जयश्रीताई महाजन यांना शिवसैनिकांकडून मानाचा मुजरा
जळगाव शहर महानगरपालिकेत आपल्या शिवसेनेची धूमधडाक्यात सत्ता प्रस्थापित करून महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल शिवाजीनगर विभागातर्फे शिवसैनिक व पदाधिकारी तसेच शिवाजीनगर वासियांतर्फे शिवसेना उप महानगर प्रमुख प्रवीण भाई पटेल तसेच विभाग प्रमुख विजय लक्ष्मण बांदल आपले खूप खूप अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो.