मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (jumbo covid centre) कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात 89 पानांची तक्रार दिली आहे. या घोटाळ्याविरोधातील आरोपींवर सात दिवसात गुन्हा दाखल करा, नाहीत आझाद मैदाना पोलीस ठाण्याच्या विरोधात कोर्टात तक्रार करणार असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
पोलिसांनी आता यावरुन सात दिवसांत गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम्ही आझाद मैदान पोलिसांना न्यायालयात खेचू, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. आझाद मैदान पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आम्ही संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने सुजीत पाटकर यांच्या बनावट कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट देण्यात आले. यावेळी अॅड. विवेकानंद गुप्ता त्यांच्यासोबत होते. संजय राऊत यांचे कौटुंबिक पार्टनर सुजीत पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने कोव्हिड पेशंटच्या जीवाशी खेळून कोरोड रुपयांचा खेळ केला. कंपनी अस्तित्वात नसतानाही बोगस कागदपत्रांद्वारे कंत्राट मिळवलं या सर्वांची माहिती पोलिसांना दिली असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. दरम्यान, कंपनी अस्तित्वात नसतानाही 100 कोटींचं कंत्राट दिलं. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांविरोधात कारवाई झाली पाहिजे. इटर्नल हेल्थ केअर नावाची कंपनीही स्थापन केली. बोगस कागदपत्रं दाखवून सुजीत पाटकर यांनी ही कंपनी स्थापन केली, असा दावाही त्यांनी केला.