TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांना वेग : माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील

वाकटुकी येथे ग्रामपंचायत कार्यालय व सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
August 7, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव/जळगाव दि. ७ (प्रतिनिधी ) – ग्रामपंचायत हा ग्रामीण विकासातील सर्वात महत्वाचा घटक असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाचे मुलभूत प्रश्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातुनच मार्गी लागत असतात. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या विकास कामांना मूर्त रूप देण्यासाठी ग्रामपंचायतीची भूमिका मोलाची असून ग्रामपंचायत ही विकासाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा कणा असतो. या ठिकाणी येणार्‍या जनतेला न्याय देण्याची भूमिका सरपंच, सदस्यांनी ठेवून अधिक विकासात्मक कामे करावी असे प्रतिपादन तत्कालीन पालकमंत्री तथा आमदार गुलाबराव पाटील यांनी केले. ते वाकटुकी येथे डीपीडीसीच्या माध्यमातून २० लाखांच्या निधीतून उभारण्यात आलेले ग्रामपंचायत कार्यालय आणि आमदार निधीतून १० लाख खर्चून उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर होते.

आ. गुलाबराव पाटील यांनी आपल्या पालकमंत्रीपदाच्या काळात जिल्हा नियोजन समिती म्हणजेच डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यातील जीर्ण झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयांसाठी प्रत्येकी २० लाख रूपयांचा निधी मंजूर करून नवीन इमारतींची उभारणी करण्यास प्राधान्य दिले होते. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथे देखील याच प्रकारे डीपीडीसीच्या २० लाख रूपये निधीतून ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात आलेले आहे. तर आमदार निधीतून १० लाखांचे सामाजिक सभागृह देखील येथे पूर्ण झाले आहे. या दोन्ही वास्तूंचे लोकार्पण आज तत्कालीन पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जि.प. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना आ.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गणवेश, वह्या व शैक्षणिक साहित्याचे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर होते.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

प्रारंभी वाकटुकी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आ. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. पाटील यांनी वाकटुकी ते चमगाव या रस्त्याचे डांबरीकरण आणि शाळेच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात येऊन अभ्यासिका बांधकाम मंजूर करणार असल्याचे सांगितले.

या वेळी व्यासपीठावर माजी पं. स.सभापती प्रेमराज पाटील, माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील सर, मा. जि. प. सदस्य गोपाल चौधरी, रवि देशमुख, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, दामू अण्णा पाटील, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, पं. स. सदस्य मुकुंदराव नन्नवरे, लोकनियुक्त सरपंच भागाबाई पाटील , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील, उपसरपंच गोपाल कोळी, ग्रा. पं. सदस्य रेखाबाई पाटील, माहेश्वरी पाटील , संजूबाई कोळी, संदीप पाटील, ग्रामसेवक अनिल पाटील, मुख्यध्यापिका रामेश्वरी बडगुजर, उपशिक्षक संभाजी बिरासदार, पंढरीनाथ कोळी, शिवसेनेचे शाखाप्रमुख रामकृष्ण पाटील, ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष पंजाबराव पाटील सोसायटीचे चेअरमन शत्रु पाटील व्हाईस चेअरमन नारायण कोळी, सर्व संचालक यांच्यासह गावातील व परिसरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आ. गुलाबराव पाटील म्हणाले की, गावाची लोकसंख्या किती आहे ? हे न बघता मी कोणत्याही गावाची गरज पाहून विकासकामांना प्राधान्य देतो. यामुळे वाकटुकीसारख्या लहान गावात देखील मोठ्या प्रमाणात विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून या माध्यमातून ग्रामस्थाना सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. भविष्यात देखील याच प्रकारे आपण विकासकामांसाठी कटीबध्द राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. तर, अध्यक्षीय भाषणात जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सोसायटी हे दोन महत्वाचे घटक असल्याचे सांगितले. परिसरातील जनतेने वेळेत कर्जफेड केल्यास त्यांना पुढे अडचण येत नाही. यामुळे सर्वांनी वेळेत कर्ज भरण्याचे आवाहन त्यांनी केले. तर वाकटुकीसारख्या लहान गावासाठी सुमारे एक कोटी रूपयांची कामे मंजूर केल्याबद्दल त्यांनी आ. गुलाबराव पाटील यांचे कौतुक केले.

याच कार्यक्रमात जि. प. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना आ.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गणवेश, वह्या व शैक्षणिक साहित्याचे करण्यात आले. तसेच येथून बदली झालेले ग्रामसेवक अनिल पाटील यांचा आ. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व प्रास्ताविक भूषण पाटील यांनी केले तर आभार ग्रामसेवक अनिल पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
Next Post

शिवसेना युवानेते आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात शिवसैनिक आपली ताकद दाखवतील : गुलाबराव वाघ (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डीपीडीसीतून होणार आता कोविडचा खर्च

September 11, 2020

अशिक्षित व्यक्ती म्हणजे भारतावरचं ओझं : गृहमंत्री अमित शहा

October 12, 2021

‘मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत’ : अमोल मिटकरी

March 8, 2022

उत्तर महाराष्ट्र वाढली थंडीची हुडहुडी ; धुळ्यात २.८ अंश तापमानाची नोंद !

January 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group