जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात यावे, अशी मागणी मनसे जिल्हा सचिव अँड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे सर्व शासकीय कार्यालय, जिल्हा न्यायालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय ५०% क्षमतेने सुरू आहेत. मात्र त्यामुळे जनतेचे खूप हाल होत असून विविध प्रकारच्या शासकीय योजनांची कामे खोळंबली आहेत. यामुळे जिल्ह्यातील जनता त्रस्त आहे. शैक्षणिक कामाकरिता विविध दाखले, जात पळताळणी, अशी कामे सुद्धा करतांना विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अजिबात नाही आहे. याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, असे यात म्हटले आहे.