जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख हे (दि.१ नोव्हेंबर) रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
रविवार, दिनांक 1 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी 13.30 वाजता शहादा येथून हेलीकॉप्टरने अमळनेरकडे प्रयाण. दुपारी 14.15 वा. अमळनेर हॅलीपॅड येथे आगमन व आमदार श्री. अनिल भाईदास पाटील यांचे निवासस्थानाकडे प्रयाण व राखीव. दुपारी 15.00 ते 15.45 वाजेपर्यंत अमळनेर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व सन्मानीय लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 15.50 वा. अमळनेर नगरपरीषद येथील जिजाऊ महिला व्यायाम शाळा व सवित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन तद्नंतर अमळनेर हेलीपॅडकडे प्रयाण. दुपारी 16.15 वा. हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.















