धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहर मुस्लीम समाज अध्यक्ष निवड प्रकरणाच्या बाबतीत शहरातील मुस्लीम बांधवांनी नुकतेच पोलिसांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शहरात आम्ही हिंदू, मुस्लीम व इतर धर्मीय आम्ही सर्व गुणगोविंदाने राहत आहे. काही किरकोळ विषय गावात झाल्यास दोन्ही समाजाचे पंच व जेष्ठ समाज सेवक बाहेर किंवा आपल्या विभागात येऊन निपटारा करून घेतात. आमच्या मुस्लीम समाजात एक मुस्लीम समाज अध्यक्ष निवडायची रीत आहे. खर तर या निवड प्रक्रीयेत गावातले १४ मोहल्ल्यातले मुस्लीम समाज बांधव भाग घेतात. व सर्वांची संमतीने अध्यक्ष निवडला जातो.
नुकतेच गावातले एक व्यापारी शेख इरफान शेख अरमान हे कोणतीही पारदर्शक निवड प्रक्रीयेत समोर न जाता काही ठरावीक लोकांच्या बैठकित स्वतःला समाज अध्यक्ष म्हणून सांगत आहे. व असे सांगून शुभेच्छा ही स्वीकारत आहे. आपल्या विभागात काही अपूर्ण सह्या केलेले कागदपत्र ही दिलेले असतील तर कृपया आपण याची नोंद घ्यावी. तसेच आपल्या विभागात कोणत्याही प्रकरणात या महाशयांना धरणगाव मुस्लीम समाज अध्यक्ष म्हणून आमंत्रित करु नये. व याबाबत त्यांना प्रत्यक्ष बोलावून समज द्यावी.
मुस्लीम समाज अध्यक्षची निवड होईपर्यंत आपल्याला आमच्या समाजाला कोणतीही सूचना किंवा भेट घ्यायची असल्यास गावातले १४ मोहल्ल्यातले मुस्लीम पंच मंडळ व ज्या मोहल्ल्यात काही कारणाने पंच नसतील त्या मोहल्ल्याचे जेष्ठ समाज बांधव भाग घेतील, याची नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सागीर अहमद खाटिक, राजू शेख, नईम काजी, फारुख भाई भंगारवाले, हाजी शेख इब्राहीम, नगर मोमिम, नजीर अहिलेकर, कमरोद्दीन मोमीन, फखरोद्दीन मोमीन, रईसशेठ भंगारवाले, जावेद कासम मोमीन, मेहबूब पठाण, इब्राहीम शकील शिरपूरकर आदींची नावे आहेत.