चोपडा प्रतिनिधी । श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाजाचे आराध्य दैवत आहेत. काही उद्योजक संताजी नावाच्या गैरवापर करीत आहेत. जालना येथील मे उबाळे कंपनीने बिडीच्या बंडलकर संतांजी नाव छापून महाराजांच्या अवमान केल्याने समस्त तेली समाजाच्या भावना दुखावल्याने उबाळे कंपनी विरुद्ध तेली समाजात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. या उबाळे कंपनीच्या मालकाच्या तीव्र शब्दात धिक्कार व निषेध करण्यात आला व सदरच्या कंपनीवर त्वरित बंदी आणून उबाळे कंपनीवर कायदेशीर कार्यवाही करावी असे मागणी करण्यात येत आहे.
या घटनेवरून काही लोक संतांच्या, महापुरुषांचा नावांच्या गैरवापर करतात बिडी बंडल, तंबाखू उत्पादन, दारू दुकाने, बिअर शॉपी, मटन हॉटेल्स यांच्यावर महापुरुषांची संतांची नावे टाकून आपला उद्योग व व्यवसाय चालवतात अशा सर्व उद्योग व्यवसायिक यांच्यामुळे जनभावना दुखावते. कोणत्याही संतांचे व महापुरुषांचे नाव ज्यामुळे जनभावना दुखावेल अश्या व्यावसायावर असू नयेत व त्यावर कार्यवाही व्हावी अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार राजेश पऊळ यांना देण्यात आले. त्यावेळी तेली समाजाचे अध्यक्ष के डी चौधरी ,सचिव बी के चौधरी, सहसचिव प्रशांत चौधरी तसेच तेली समाजाचे कार्यकर्ते नारायण चौधरी, छोटू चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र चौधरी, लक्ष्मण चौधरी, सूर्यकांत चौधरी आदी उपस्थित होते.