मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसात तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटनं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्स ५८ हजारांच्या पार पोहचला आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रात, सेन्सेक्स २१७ अंकांनी उसळी घेत ५८,०६९ वर पोहोचला. तर निफ्टी ६६.२० गुणांनी वाढून १७,३०० वर पोहोचला आहे.
जागतिक बूाजारातील सकारात्कम परिणार शेअर बाजारावर दिसत आहेत. आशियाई बाजारातही तेजी बघायला मिळत आहे. SGX NIFTY आणि DOW FUTURES सध्या उलाढालही योग्य प्रमाणात सुरु आहे. दुसरीकडे अमेरिकेतही एलअँडपी ५०० आणि एनएएसडीक्यू विक्रमी अंकांवर बंद झाले होते. अमेरिकेच्या बाजारातून सकारात्मक संकेत, देशातील कोरोना रुग्णांमध्ये झालेली घट आणि वेगाने वाढणारी लसीकरण मोहीम याचे सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आले.
गुरुवारी शेअर बाजारात दिवसभराच्या उलाढालीनंतर तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स ५१४.३३ अंकासह ५७,८५२.५४ अंकांवर बंद झाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १५७.९० अंकांसह १७.२३४.१५ अंकांवर बंद झाला होता.