बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व बहुजनवादी पक्ष व सामाजिक संघटना यांच्या वतीने बहुजन उध्दारकर्ते महापुरुषांच्या बाबत सातत्याने बेताल वक्तव्य करणा-या राज्यपाल कोश्यारी व शिदे-फडणवीस सरकारच्या मंत्री, आमदारांचा निषेध करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मलकापूर चौफुली येथे रस्ता रोको करण्यात आला. नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,कँबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,आमदार प्रसाद लाड, आमदार राम कदम, भाजप प्रवक्ते सुधांशु त्त्रिवेदी हे सातत्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवांच्या बाबत बदनामीकारक आणि इतिहासाची तोडमोड करणारे वक्तव्य करत असतात. या लोकांच्या निषेध करत सर्वाचे तात्काळ राजीनामा घेण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. महापुरुषाबद्दल बदनामी करण्या-या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय अशा कोणत्याही व्यक्तीविरोधात कठोर कायद्याची निर्मिती करण्यात यावी. तसेच शाई फेक करणारे भिमवीर मनोज गरबडे यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हें मागे घेण्यात यावे.
यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील, शहर अध्यक्ष प्रदिप बडगुजर ,माजी नगरसेवक कैलास चौधरी ,माजी सभापती किशोर गायकवाड,नगरसेवक भरतआप्पा पाटील,राष्ट्रवादी गटनेते जफर शेख ,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अशोक निकम ,शहर अध्यक्ष शैलेश वराडे,संभाजी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील, अनंता वाघ,निवृत्ती ढोले, गणेश मुलांडे, गणेश सोनवणे, गणेश पाटील,दिपक खराटे, विनोद पाडर, हिंगणाचे सरपंच रामराव पाटील,शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख गजानन खोडके ,सतोष माळी ,कॉंग्रेस आय चे तालुका अध्यक्ष भारत पाटील, जेष्ठ नेते विरेद्रसिंग पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटील ,बाळू पाटील, विनोद मायकर, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष सुपडा निकम, शहर अध्यक्ष आण्णा रेणुके, नागसेन सुरडकर, सलिम शेख आठवले गटाचे संजय तायडे. तालुका अध्यक्ष सदानंद वाघ,तालुका युवाध्यक्ष ,भगवान तायडे .राजू शेजोळे, माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष डॉ आनंद माळी, आबा माळी ,दिलिप महाजन, यांच्या सह समविचारी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.













