चोपडा (प्रतिनिधी)– नगरपरिषदचे रस्त्यावरील झाडू,गटारी साफ करणाऱ्या,घनकचरा घटा गाडीवरील,अश्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य न झाल्याने आज पासून ठिय्या आंदोलन बसलेले आहेत
सविस्तर असे की, मागिल 4 ते 5 वर्षा पासून कंत्राटी कर्मचाऱ्याचा ठिय्या आंदोलन सुरू केले आहे ह्यात
आरोग्य विभागातील कंत्राटी सर्व कर्मचा-यांच्या मागणी संदर्भात संबंधित अधिका- यांशी व कंत्राटदार यांना वारंवार पत्रव्यवहार करुन संबंधित विभागाकडून कंत्राटी कर्मचा-याच्या मागणीची दखल घेतली जात नाही असे निदर्शनास आले आहे. तरी संबंधित कंत्राटी कर्मचा-यांच्या मागण्या खालील प्रमाणे महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे कंत्राटी कर्मचा-यांना किमान वेतन नुसार वेतन मिळावे,कंत्राटी कर्मचा-यांच्या वेतन त्यांच्या बँक खात्यात मिळावे,कंत्राटी कर्मचा-यांना दर महिन्याला ७ ते १० तारखेपर्यत वेतन मिळावे,
कंत्राटी कर्मचा-यांना दर महिन्यातुन ४ पगारी सुट्या मिळाव्यात,
कंत्राटी कर्मचा-यांचा EPFO दर महिन्याला भरण्यात यावा,कंत्राटी कर्मचा-यांना ESIC नंबर त्वरीत मिळावा,आम्ही अर्जदार मागील ५ ते ६ वर्षापासून घनकचरा व्यस्थापन, कचरा, झाडू व गटारकाम कंत्राटी पध्दतीत चोपडा नगरपरिषद अंतर्गत काम करीत आहोत कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी व आमच्या वरील प्रमाणे मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही दि.०९/१२/२०२४ वार सोमवार पासुन बेमुदत संपावर जाणार आहोत यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपरिषद चोपडा मेनगेटच्या उजवीकडे कामबंद ठिय्या आंदोलन करणार आहोत, यासाठी सर्व जनतेने सहकार्य करावे आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला सहकार्य करावे