जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य विभागात महाराष्ट्र शासनाने यशस्वी ग्रुप या कंपनीला ठेकेदार पद्धतीने डाटा एंट्री ऑपरेटर भरले असुन यशस्वी ग्रुपच्या मनमानी कारभारा विरोधात या डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी संप पुकारला आहे तसे निवेदन प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले असुन आज डॉ. अभिषेक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
आरोग्य विभागात मनुष्यबळ कमी असल्याने डाटा एन्ट्री ऑपरेटर चे कामे करण्यासाठी पुणे येथील यशस्वी ग्रुप या कंपनीला करार दिलेला असुन यशस्वी ग्रुप या कंपनी मार्फत आरोग्य विभागात डाटा एंट्री ऑपरेटर प्रशिक्षणार्थी म्हणुन भरती केले आहे. त्यांना महिन्याला फक्त ९ हजार प्रमाणे मानधन अदा करण्यात येते. मात्र कंपनीकडून मनमानी पध्दतीने त्यांना पटेल तेव्हा काढून टाकत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागात काम करणारे संपूर्ण डाटा एंट्री ऑपरेटर यांनी संप पुकारला आहे.
कोविड काळात ज्यांनी आपल्या जिवाची व परिवाराची पर्वा न करता डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी काम केले असतांना कंपनीकडून अन्याय करण्यात येत असून शासनाने याबाबत दाखल घ्यावी व शासनाने करार काढुन घेऊन महाराष्ट्रातील संपूर्ण डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सामावून घ्यावे किंवा शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली जात आहे. अश्या या यशस्वी ग्रुप च्या मनमानी कारभारा विषयी संपूर्ण जिल्हात मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद समोर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी अनिल बडगुजर, पियूष भोळे, किशोर पाटील, दीपक कोळी, सुदर्शन कोळी, विशाल कोळी, मनोज सोनवणे आदी उपस्थित आहेत.