धरणगाव (प्रतिनिधी) आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपालिकेमध्ये आयोजित कार्यक्रमात गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी अतिशय सुंदर असे नृत्य आणि वक्तृत्व सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
सर्वप्रथम ध्वजारोहण ज्येष्ठ सफाई कामगार शोभा पटोणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमांमध्ये गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल वैशाली नितीन पवार, धरणगाव नगरीचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगरसेवक व नगरसेविका, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका तहजीब मॅडम, शुभांगी पाटील, अंकिता पवार, सोनाली मराठे, वैशाली जैन, चैताली पवार आणि माधुरीताई या उपस्थित होत्या.
यावेळी देशभक्तीपर नृत्यामध्ये सनवी खले, श्रावणी अमृतकर, भूमी पाटील, पंखुडी गुजराती,समृद्धी भावे , गौरी पाटील, कृष्णा पवार, लोकेश गरुड, भविष्यम पाटील, शुभम बडगुजर, आद्य ठाकूर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच भूमी पाटील, एकता महाजन, गौरी पाटील, सनवी खले या विद्यार्थ्यांनी सुंदर असे वक्तृत्व सादर केले. यावेळी उपस्थिती सर्व मान्यवरांनी टाळ्यांच्या गडगडाटात चिमुकल्यांचे कौतुक केले.