जळगाव (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी स्वतःची निर्णय क्षमता विकसित केल्यास कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्याची संधी उपलब्ध आहे असे प्रतिपादन शिक्षण तज्ञ मोहम्मद अमीर अन्सारी (मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
जळगाव येथील ईमदाद फाउंडेशन आयोजित दहावी व बारावी नंतर काय याबाबत अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज दुपारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मो. आमिर अन्सारी यांनी वरील काढले. विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार व त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात पुढे जाऊ द्यावे त्याकरता पालकांनी कोणताही हस्तक्षेप करू नये असे आव्हान त्यांनी पालकांना केले, जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व पालक यांनी या चर्चासत्रात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
दरम्यान सकाळी प्रथम सत्रात शहरातील अल्पसंख्यांक विद्यालयातील शिक्षकांसोबत पद्मालय विश्रामगृह येथे संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शहरांमधील शिक्षकांनी सहभाग नोंदवला शिक्षण क्षेत्रात होणारे नाविन्यपूर्ण बदल लक्षात घेऊन शिक्षकांनी सातत्याने लक्ष द्यावे असे मो. आमिर अन्सारी यांनी शिक्षकांना केले. या प्रसंगी मुंबई येथील उद्योजक हाफेजूर रहेमान अन्सारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उद्योग क्षेत्रात असलेल्या विविध संधी बद्दल माहिती दिली.
ईमदाद फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या ‘एज्युकेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत प्रथमच असे शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात होते आले असुन या प्रकारचे कार्यक्रम नियमित आयोजित केले जातील अशी माहिती ईमदाद फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड जमील देशपांडे यांनी दिली.
ईमदाद फाउंडेशन चे मार्गदर्शक शकील देशपांडे,असलम पटेल, सचिव मो. आरीफ देशमुख, उपाध्यक्ष मतीन पटेल, आसिफ देशपांडे, मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलफैज पटेल यांनी केले तर समारोप सद्दाम पटेल यांनी केला.