TheClearNews.Com
Saturday, June 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भगव्याच्या रक्षणासाठी सतत झटत राहणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

तरसोद येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रत्येक माणूस देवाच्या अनुष्ठानाशिवाय मोठा होऊ शकत नाही, जीवनातत कितीही ब्रेकर आले तरी परमेश्वर आपला मार्ग सुकर करतो, त्यासाठी आपणही आपले कर्तव्य पार पाडले पाहीजे. पालकमंत्री या नात्याने जळगाव ग्रामीण मतदार संघातील देवस्थांनांच्या विकासासाठी भरभरून निधी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केलेत व करत आहे. आजही कामाला मतं देणारे आहेत म्हणून लोकशाही जीवंत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, तरसोद येथील पाटील वाड्यात व राजपूत वाड्यात लवकरच सामाजिक सभागृह मंजूर करणार असून मतदार संघातील शेत रस्त्यांसाठी पुढील काळात 7 कोटी रूपयांमधून विकास होणार आहे. जिल्ह्यातील 800 गावांना पाणी योजनेचे काम हाती घेतले आहे. एव्हढेच नाही तर मतदार संघातील प्रत्येक गावातील ज्या-ज्या समस्या माझ्यापर्यंत येतील त्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली. बाळासाहेबांच्या प्रेरणेने 35 वर्षांपासून खांद्यावर भगवा घेऊन भगव्याच्या रक्षणासाठी झटत आलेलो आहे पुढेही झटत राहणार असे परखड मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. तालुक्यातील तरसोद येथील सुप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र गणपती देवस्थान धार्मिक ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ना. गुलाबराव पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन मंदिर देवस्थान संस्थान, ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पंकज पाटील यांनी केले होते.

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी महापौर ललित भाऊ कोल्हे, जि.प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील , माजी सभापती पुष्पाताई पाटील, जि .प सदस्य पवन सोनवणे, सरपंच संतोष सावकारे, उपसरपंच निलेश पाटील, ग्रामसेवक नरेंद्र साळुंके, श्री गणपती देवस्थानचे अध्यक्ष सुभाष बरहाटे, सर्व विश्वस्त, उपजिल्हा प्रमुख नरेंद्र सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, गजानन पाटील, युवा सेनेचे शिवराज पाटील, माजी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील (कोळी), उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, तुषार महाजन, गिरीश भोळे, तालुका संघटक अजय महाजन, रविंद्र चव्हाण सर, रमेशआप्पा पाटील, नशिराबाद माजी सरपंच विकास पाटील, विकास धनगर, चंदूभोळे, उपतालुका प्रमुख धोंडू जगताप, राजेंद्र पाटील, निलेश वाघ, डॉ. कमलाकर पाटील, संजय घुगे, रवि कापडणे, नंदलाल देशमुख, गोपाल जिभाऊ, साहेबराव पाटील, ब्रिजलाल पाटील, बापू महाजन, चेतन पोळ, जितू पोळ, श्रीराम पाटील, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उप अभियंता जे. एस. सोनवणे, सा. बा.चे उप अभियंता गिरीश सूर्यवंशी, कॉन्ट्रॅक्टर नानाभाऊ सोनवणे, शर्मा, परिसरातील सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थ व भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन !

तालुक्यातील तरसोद येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भुमीपुजन व लोकार्पण करण्यात आले. खास करून याठिकाणी असलेले पेशवे कालीन जागृत श्री गणरायाच्या देवस्थानासाठी भरभरून निधी उपलब्ध करून दिल्याने व या क्षेत्रास पर्यटनस्थळाचा ‘ब’ दर्जा प्राप्त करून दिल्याने देवस्थानावर विकासकामांचा एकप्रकारे धडाकाच सुरू आहे.या देवास्थानचा जगभरात नावलौकीक आहे, ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत गणपती मंदीर परिसरात भक्तनिवासाचे व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंदिरालगत पुलाच्या बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले. तर पर्यटन विकास योजनेतून गणपती मंदिर परिसरात खुले सभागृह ,स्वच्छतागृह प्रवेशद्वार संरक्षण भिंत पार्किंग व बगीचा सुशोभीकरण करणे यासाठी 4 (कोटी 89 लक्ष), डीपीडीसी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे (22 लक्ष), स्मशानभूमी बांधकाम व सुशोबीकरण करणे (१० लक्ष), आमदार निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसवणे (5 लक्ष), मूलभूत सुविधा अंतर्गत म्हणजेच २५१५ मधून एलएडी बसविणे (5.50 लक्ष) अशा एकूण 5 कोटी 30 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.

भाविकांची व ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रथमत: मंदिरास पर्यटनस्थळाचा ‘ब’ दर्जा मिळवून आणला. यानंतर रस्त्यांसह मंदिर विकासासाठी आवश्यक तितका निधी मिळवून दिला. तसेच तरसोद गावात पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लाग, एल.ई.डी. लाईट, स्मशानभुमी, व्यायामशाळा, समाज मंदिर आदींसाठी सुमारे साडेसात कोटी रूपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल मंदिर संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत व वि. का. सोसायटी मार्फत ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील,जि. प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले तर पालमंत्री यांनी तरसोद गावासाठी केलेले हे प्रयत्न बघता कितीही आभार मानले तरी कमीच असतील असे मत व्यक्त करत तरसोद ग्रामपंचायत, विकास सोसायटी, गणपती मंदिर संस्थान व ग्रामस्थांमार्फत आयोजक तथा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पंकज पाटील यांनी आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
जळगाव

श्री.धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रुजू

June 19, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

‘खान्देश रन’मध्ये जैन इरिगेशनचे 1000 हून अधिक सहकारी धावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात CBI कडून गुन्हा दाखल; ५.६२ फेसबुक डेटा चोरी केल्याचा आरोप

January 22, 2021

एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्था करणार सभासदांची मोफत डोळे तपासणी !

December 16, 2020

खळबळजनक : राज्य गुप्तचर विभागातील पोलीस अधिकाऱ्याचा तुकडे झालेला मृतदेह आढळला रेल्वे रुळावर !

March 10, 2024

खडसे आणि त्यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता : अ‍ॅड. असीम सरोदे

July 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group