जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार या अफवेने जळगावात (Jalgaon) विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आंदोलन केले. यावेळी ऑफलाईन परीक्षेविरोधात घोषणाबाजी केली. सोशल मीडियावर (Social Media) दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार असल्याची अफवा हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) नामक तरुणाने पसरली होती.
हिंदुस्थानी भाऊने व्हिडिओद्वारे यासाठी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात यासाठी रस्त्यावर उतरणार अशा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर आले होते. जळगावातही शेकडोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बारावीच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्या या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनीताबडतोब दखल घेवून सामंजस्यांची भूमिका घेत विद्यार्थ्यांना समजाविले. गोंधळ न करता त्यांनी मागणीचे निवेदन द्यावे, तसेच गर्दी न करता घरी जावे असे अवाहन केले. तसेच कारवाईचा ईशाराही दिला. कोणत्याही अवाहनाशिवाय हे सर्व विद्यार्थी हे अचानक पणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेकडोंच्या संख्येने जमल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र, पोलिसांनी सयंमाची भूमिका घेत विद्यार्थ्यांना पागंविले.
विकास पाठक तथा हिंदुस्थानी भाई म्हणून हे पात्र सोशल मीडियात प्रसिद्ध आहे. त्याने २६ जानेवारी रोजी यासाठीचा व्हिडीओ जारी करून ३१ जानेवारीला आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. यामुळे महाराष्ट्रभर आंदोलन पेटले. त्याला यूट्यूब YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल साईटवर मोठ्या प्रमाणात फॅालोअर्स आहेत. विकास पाठक सोशल मीडियावर विविध नेत्यांचे वादग्रस्त व्हिडीओ प्रसिद्ध करत असतो. नेते बोलत असतानाचे त्यांचे एक दोन मिनिटांचे व्हिडीओ कट करुन त्यामध्ये ‘रुको जरा’ ‘आगे देखो’ सबर करो…असे शब्दप्रयोग करतो. हे डायलॅाग अनेकदा आपण ऐकला अथवा पाहिला असेल. या डायलॉगमुळेच हिंदुस्थानी भाऊ प्रसिद्धीझोतात आला आहे.
















