चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोख्या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते करण्यात आले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील या परिषदेस
उपस्थित राहिले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला आणि शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारच्या उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या कष्टांची प्रशंसा करत, त्यांनी त्यांच्या उज्जवल भविष्याची शुभेच्छा दिली.
पालकांनी देखील या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
ह्या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास सक्षम करत त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान अर्थपूर्ण रीतीने प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी, गणित, शास्त्र, सामाजिक शास्त्र, हिंदी तसेच कॉम्प्युटर इत्यादी विषयांचे ज्ञान प्रदर्शित करणारे तक्ते, मॉडेल्स आणि प्रात्यक्षिके आत्मविश्वासाने सादर केले.
शाळेतील शिक्षिका दिपाली पाटील, सुचिता पाटील, प्राजक्ता सोनवणे, अर्चना जैन, सलोनी अग्रवाल, कल्याणी देशमुख, सारिका पवार, अश्विनी ढबू , जुईली ठाकरे, पूनम पाटील, दीप्ती पाटील, शितल भावसार, गायत्री पाटील, माधुरी पाटील, रोहिणी बाहेती, वैशाली सोनवणे, करुणा पाटील आणि कपिल पाटील या शिक्षकांनी आणि इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्टुडन्ट लेड कॉन्फरन्स’ चे यशस्वी आयोजन केले.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण परिषदेच्या आयोजनासाठी आणि यशस्वीतेसाठी शाळा समन्वयक अश्विनी पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच परिषदेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.