जळगाव (प्रतिनिधी) लग्नाच्या अवघ्या दहा दिवसानंतर विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शहरातील दांडेकरनगर परिसरात घडली. करीना सागर निकम (वय १९) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
न्हावी (ता. यावल) येथील माहेर असलेल्या करीना सागर निकम (वय १९) या तरूणीचा विवाह गेल्या आठवड्यात ११ जुलैला जळगावातील दांडेकरनगरामधील सागर निकम याच्याशी झाला होता. आज सकाळी अकराच्या सुमारास घरात कुणी नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली. करीना सागर निकम हिने आज सकाळी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरे राजू निकम, पती सागर निकम हे कामावर गेले होते. तर दिर नागेश घरात झोपलेला होता. सासुबाई निर्मलाबाई निकम बाहेरून आल्यानंतर त्यांना करीनाने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पोलीस तपास करत आहेत.