जळगाव (प्रतिनिधी) मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुनील वसंत वंजारी यांची तर व्हाईस चेअरमनपदी जयंत किसन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड जि जळगाव सन 2024 ते 2029 अशी राहणार आहे.
यावेळी संचालक मंडळातील सुनीलभाऊ सुपडू महाजन, भागवत बुधो धांडे, ज्ञानेश्वर वामन नाईक, प्रमोद यशवंत नाईक, सुखदेव परशुराम सोनवणे, सुदाम दोधु पाटील, गणेश विठ्ठल सोनवणे, निरंजन जगन्नाथ पाटील, भूषण राजेंद्र सोनवणे, मंदाकिनी लक्ष्मण महाजन, सुनंदाबाई भास्कर नाईक, भागवत चावदस सानप तसेच तज्ञ्ज्ञ संचालकपदी योगेश पुंडलिक सांगळे, जयराम नामदेव पाटील, अँड. बुरानुद्दिन सदृद्दीन पिरजादे यांची देखील निवड करण्यात आली.
मेहरुण गावाची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखण्यात आली. यासाठी गावातील सर्व समाज बांधव, सर्व गावातील लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले. त्यात प्रामुख्याने सुनीलभाऊ महाजन, प्रशांतभाऊ सुरेश नाईक, गणेशभाऊ किसन सोनवणे, अशोकभाऊ सिताराम लाडवंजारी यांनी बिनविरोध प्रक्रियासाठी सहकार्य केले.एस.एस. शिंदे सहकार अधिकारी व सचिव गोकुळ पाटील ज्ञानेश्वर घुगे यांचे निवडणूक प्रक्रीयेकमी सहकार्य लाभले.