जळगाव (प्रतिनिधी) येथील ई – सेवा केंद्रातून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरणाऱ्या अटल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली असून त्याला पुढील कारवाईसाठी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अक्षय प्रकाश छाडेकर असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे की, अक्षय प्रकाश छाडेकर (वय २३) भोईगल्ली पाळधी ता. जामनेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जामनेर शहरातील जितेंद्र वसंत पाटील यांच्या ई – सेवा केंद्रातून लॅपटॉप चोरीला गेला होता. याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पो.हे.कॉ. प्रदीप पाटील, सुनिल दामोदरे, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, पंकज शिंदे यांनी अक्षय छाडेकर यास पाळधी ता. जामनेर येथुन शिताफीने मिळालेल्या माहितीनुसार अटक केली. अक्षय प्रकाश छाडेकर हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याला पुढील कारवाईसाठी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.