धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ व विक्रम ग्रंथालय मोफत वाचनालयाच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व समाजचिंतक यांचे सात दिवसाच्या जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर व्याख्यानमाला १५ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत धरणगाव येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात साजरी होणार आहे. या व्याख्यानमाले अंतर्गत सामाजिक, कृषी व मातृशक्ती या विषयांवर आधारित व्याख्यानमालांचा आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमाला सायंकाळी ८.३० वाजता सुरू होईल व्याख्यानमालेत महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आयोजकांनी केलेली आहे.
पुढील प्रमाणे व्याख्यानाचा विषय व व्याख्याते !
१५ एप्रिल शनिवार रोजी – ‘मृत्युंजय स्वातंत्र्यवीर सावरकर’- वक्ते : अक्षय जोग पुणे,
१६ एप्रिल – ‘सामाजिक राष्ट्रवादाचे जनक फुले शाहू आंबेडकर’ वक्ते रमेश पांडव छत्रपती संभाजी नगर,
१७ एप्रिल सोमवार ‘जीवन सुंदर आहे’ वक्ते गणेश शिंदे पुणे,
१८ एप्रिल – ‘हवामानावर आधारित शेती काळाची गरज’ वक्ते पंजाबराव डक पाटील परभणी,
१९ एप्रिल- ‘थोरले राजे सांगून गेले’ वक्ते रवींद्र चव्हाण पाटील पाचोरा,
२० एप्रिल- ‘गुगल आणि गुरुजी’ वक्ते -दिलीप बेतकीकर गोवा,
२१ एप्रिल ‘मातृत्वाची हिमोशी करे’ -वक्ते -प्रकाश पाठक धुळे,
वरील प्रमाणे व्याख्याते असून सदरहून आयोजित व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमलाल शेठ भाटिया व संस्थेचे सचिव तसेच ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. आ.एन. महाजन यांनी व दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व संचालक मंडळाने केले आहे.