TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : सहाव्या आरोपीला अटक ; आज न्यायालयात करणार हजर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 30, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी खून प्रकरणातील सहाव्या आरोपीला पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. या आरोपीची देखील कसून चौकशी सुरु असून त्याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, काल (सोमवार) रोजी पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याशी संबंधित महत्वपूर्ण माहिती पोलिसांना दिली असल्याचे कळते.

 

READ ALSO

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

या संदर्भात अधिक असे की, जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांचा पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून खून झाला होता. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली होती. दरम्यान, पाच आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कर्मचारी असल्याची माहिती सोमवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे एका पत्रकार परिषदमध्ये दिली. दरम्यान, तपासावर परिणाम होऊ नये म्हणून आरोपींची नाव पोलीस अधीक्षकांनी गोपनीय ठेवण्याचे आवाहन पत्रकारांना केले होते. त्यानुसार आरोपींची नावे प्रकाशित करण्यात येत नाहीय.

 

अटक आरोपींनी दिली पोलीस चौकशीत महत्वपूर्ण माहिती

 

दुसरीकडे रात्री उशिरा या गुन्ह्यातील सहाव्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्या आरोपीला आज दुपारी धरणगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, आधी अटक केलेल्या आरोपींनी पोलिस चौकशीत गुन्ह्याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार गुन्ह्यात कोण कोण सहभागी होते? तसेच त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचा सहभाग आहे? याबाबत माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर या गुन्ह्याचा मास्टर माइंड हा पोलीस कर्मचारी असल्याचे या चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

 

आज आरोपींची ओळख परेड होण्याची शक्यता !

 

सोमवारी सायंकाळी धरणगाव न्यायालयात न्या. सावरकर यांच्यासमोर आरोपींना हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी पाचही आरोपींसाठी पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी मागितली. त्यानुसार कोर्टाने आरोपींना १३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे पाचही आरोपींची लागलीच जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, आज आरोपींची ओळख परेड होण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा कोताही पुरावा किंवाधागा नसतानाही पोलिसांनी आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी करून दाखवली आहे.

 

काय होती नेमकी घटना?

 

जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करून पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होऊ न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले. तशाही अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावर जोरात पळत बचावाचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यासह त्याच्यासोबतच्या कामगाराने प्रतिकार केल्यानंतर हल्लेखोर पैशांची बॅग सोडून पळून गेले. जखमी व्यापाऱ्याला तातडीने रुग्णवाहिकेत खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
Next Post

भारतात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकरी आंदोलन डावे, माओवाद्यांच्या हातात; मोदींच्या बड्या मंत्र्याचा गंभीर आरोप

December 12, 2020

संतापजनक : अल्पवयीन मुलीला चाळीसगावात अनैतिक कृत्य करण्यास पाडले भाग !

February 27, 2023

दुर्दैवी घटना : अंतुर्ली येथे आईला वाचविताना मुलाचाही विहिरीत बुडून मृत्यू !

September 9, 2021

खडसेंच्या सांगण्यावरून सर्व घडले ; तेजस मोरेचा खळबळजनक आरोप !

March 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group