जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मधील डी. एम. एंटरप्राइजेस व साई मल्टी सर्विसेस यांच्या टेंडरच्या एग्रीमेंटची कॉपी आजपर्यंत सादर केलेली नाही. याबाबत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ॲड. कुणाल पवार, विष्णू भंगाळे, देवेंद्र मराठे, ॲड. अभिजीत रंधे यांनी प्रा. कुलगुरू यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आपल्याला विद्यापीठात सदर ठेकेदाराने विषयी कागदपत्र सादर न करता त्यास चुकीच्या पद्धतीने ठेके दिले गेले आहे. त्यांना वर्कऑर्डरची प्रत दिलेली नाही. मागील ठेकेदाराला फोन करून विचारले असता त्यास वाढीव मुदत दिली नाही. कर्मचारी कामगार यांचे वेतन देखील ठेकेदार कमी करत आहेत. तसेच विद्यापीठात नॅक साठी रंगकाम सुरु केले आहेत. त्यांचे देखील कागदपत्र ठेवीदारांची नावे उपलब्ध नाहीत. सभागृहातील इतिहास देखील बदलवले जात आहे. सदर टेंडर हे फक्त भ्रष्टाचार फेलावला जावा म्हणून तयार केले गेले आहेत काय? अशी शंका आहे.
ठेकेदारांच्या कामगारांना पूर्ण बोनस, भत्ते, नुकसान भरपाई विद्यापीठाने किंवा ठेकेदाराने दिले नाही. त्याबाबत तक्रार दाखल झाले आहेत. तसे असताना नवीन ठेकेदार नेमले गेले आहेत. त्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाले आहेत याबाबत शंका येते आहे. तरी याची सविस्तर चौकशी करावी, कारण कायदेशीर नोटीस देताना ठेकेदारांचे प्रतिनिधी उपलब्ध नव्हते. सदर प्रकार गंभीर व भयंकर असून आर्थिक दिवाळखोरी कडे विद्यापीठास घेऊन जात आहे याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व शिक्षणमंत्री महोदयांना पुतळा जाळल्या बद्दल देखील दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे.
















