धरणगाव (प्रतिनिधी) येथील तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या सततच्या मनमानी व हुकुमशाही कारभार रोखून तलाठी व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी करत समस्त तलाठ्यांनी बंड पुकारले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात तहसीलदार देवरे यांच्या कारवाई न झाल्यास उद्यापासून उपोषणास बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, तहसील देवरे यांच्यावर महीला तलाठ्यांबाबत चुकीची वर्तणूक दिल्याचा गंभीर आरोप देखील तलाठ्यांनी लावला आहे.
धरणगाव तालुक्यातील समस्त तलाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हंटले की, धरणगाव तहसिलदार नितीन कुमार देवरे हे रुजू झालेपासून आपल्या मनमानी व हुकुमशाही कारभाराने संपूर्ण धरणगाव तालुक्यातील तलाठी वर्गास वेठीस धरून अन्यायकारक वागणूक देत आहेत. पदाचा अहंभाव मनात बाळगून पदाचा गैरवापर करून तलाठ्यांवर बेकायदेशीर कारवाया करत आहेत. त्यामुळे समस्त तलाठ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून तलाठ्यांचे मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. तलाठ्यांना नेहमी तुच्छ लेखतात त्यामुळे तलाठ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ब-याच तलाठ्यांकडे अतिरीक्त कार्यभार असल्याने कामाचा दबाव येतो तरीदेखील तलाठी वर्ग दिवसरात्र काम करत आहे. तलाठी वर्गाकडे महसूल विषयक कामाव्यतीरीक्त इतर बरीच कामं असतात. कोरोना कालावधीत स्वतःच्या प्रकृतीची, कुटुंबाची पर्वा न करता एकही दिवस रजा न घेता संपूर्ण तलाठी वर्गाने कोरोनाशी लढा दिला व तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी वेळोवेळी शासन स्तरावरून प्राप्त आदेशांचे काटेकोरपणे पालन केले.
धरणगाव तहसिलदार नितीनकुमार देवरे हे वेळोवेळी मनमानी आदेश काढतात. जे तलाठी त्यांच्या मर्जीनुसार वागत नाहीत त्यांच्यावर मनात आकस ठेवून त्यांचेवर विनावेतन करणे, निलंबनाचे प्रस्ताव वरीष्ठ अधिका-याकडे सादर करणे, वेतनवाढ रोखण्याबाबत नोटीसा काढणे अशा कारवाया करतात.
धरणगाव तहसिलदार नितीनकुमार देवरे हे तलाठ्यांना वेळोवेळी कारवाईच्या नोटीसा काढतात व त्याबाबतचे खुलासे स्विकारत नाहीत व खुलासा सादर न केल्याचे कारण ठेवून पुढील कारवाई करतात. ब-याच तलाठ्यांवर विनावेतनाच्या कारवाया केल्या आहेत. जो तलाठी त्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही त्या तलाठ्याला/कर्मचाऱ्याला वारंवार अपमानित करून नोटीस देऊन प्रचंड मानसिक त्रास देतात.
कामापेक्षा देखावा करण्यावर भर
धरणगाव तहसीलदार नितीन देवरे यांना कामापेक्षा दिखावा प्रिय आहे. त्यामुळे ते अनावश्यक बाबींसाठी सर्व तलाठी वर्गास वेठीस धरतात. वेळी अवेळी व्हाट्सअँपवर मॅसेज करुन रात्री अपरात्री मॅसेजचा रिप्लाय देण्यासाठी दबाव आणतात. एखाद्या तलाठयाने रात्री अपरात्री येणाऱ्या मॅसेजला प्रतीसाद न दिल्यास ते भर मिटींगमध्ये त्याचा पाणउतारा करतात.
सुट्टी देताना उपकार केल्याचे भाव
जिल्हाधिकारी साहेब, तलाठी सुद्धा माणूस आहे हे कदाचित धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे हे विसरून गेले आहेत. तलाठ्याला ही आईवडील, बहीण भाऊ, मुले, पत्नी असा परीवार असतो. परीवाराचे स्वास्थ, सुख-दुःख, लग्नसमारंभ, मरण अशा ब-याच कामासाठी तलाठ्यास ब-याच जबाबदा-या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे तलाठ्यास रज़ा मागावी लागते. “मला विचारल्याशिवाय साखरपुडा तसेच लग्नाची तारीख पकडायची नाही असे म. नितीनकुमार देवरे सो. तहसीलदार धरणगाव यांनी सर्व तलाठयांना स्पष्ट ठणकाऊन सांगितले आहे. रजा मागण्याचा कायदेशीर अधिकार असतानाही रजा मागण्यास गेले असता म नितीनकुमार देवरे सो. तहसीलदार धरणगाव अपमानास्पद बोलून शासकीय कामांचे कारण सांगून रजा नाकारतात. रजा दिलीच तर वारंवार उपकार केल्याची जाणीव करून देतात. शनिवार, रविवार तसेच शासकीय सुटीच्या दिवशी म. नितीनकुमार देवरे सो. तहसीलदार धरणगाव हे कोणता ना कोणता शासकीय आदेश काढतात किंवा व्हाट्सअँपवर मेसेज पाठवून कार्यालयात बोलावतात. अगदी दिवाळीच्या सुट्टीच्या काळात देखील काही तलाठयांवर विनावेतनाची कारवाई केली आहे.
धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या कार्यपद्धतीमूळे आणी दबावत्रांने तलाठ्यांच्या परीवारात कौटुंबिक कलह, वाद निर्माण होऊन परिवारातील सदस्य किंवा तलाठ्यासोबत काही अपप्रकार किंवा अनुचित प्रकार घडून काही बरेवाईट झाल्यास त्यास धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे हे सर्वस्वी जबाबदार राहतील.
तरी मा. महोदय आम्ही आपणास नम्र निवेदन सादर करतो की, धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी मनात आकस न ठेवता तलाठ्यांना अपमानास्पद वागणूक न देता, कारवाईची भाषा वापरता उचित वागणूक द्यावी तसेच तलाठ्यांचे स्वतःचे व कौटुंबिक स्वास्थ अबाधीत राहील अशा उद्देशाने योग्य प्रशासकीय कारभार चालवावा. अन्यथा कोविड १९ संदर्भातील कामे तसेच नैसर्गीक तलाठ्याला कामकाज क्षेत्रीय स्वरूपाची असल्याने तलाठ्याला वेळोवेळी दुचाकीवर प्रवास करावा लागतो त्यामुळे बऱ्याचदा मोबाईल फोन उचलायला वेळ होतो. गाडीवर असल्याने मोबाईल फोन उचलल्या न गेल्यामुळे पुन्हा म. नितीनकुमार देवरे सो. तहसीलदार धरणगांव यांना कॉलबँक केला असता ते फोन स्विकारत नाहीत व नंतर त्याबाबत नोटीसा देतात. त्यांना आपण कॉलबॅक केल्याचे सांगितल्यास “मी तहसिलदार आहे मी तुझा फोन का बरं उचलायचा?” असे बोलतात.
महीला तलाठ्यांबाबत चुकीची वर्तणूक
तहसीलदार नितीनकुमार देवरे हे महीला तलाठयांच्या बाबतीत सतत असंवेदनशील व अपमानकारक भाषेचा वापर करतात. महीला तलाठयांना तुम्ही बोगस धंदे करता, नुसतं पर्स घेवून फिरत राहता. काम करण्याची बोंब पाडत नाहीत. नुसत थोबाड घेवून फिरत असता. असे अपमानकारक शब्द वापरुन त्यांचा वेळोवेळी छळ करणे सुरु केले आहे. काही महीला तलाठींना “ऐ, काय बाई आहेस तू ! तूला समजत नाही का ?” असे गंभीर असंवेदशील व मानहाणीकारक शब्द वापरतात. महीला तलाठयांना तहसिल कार्यालयात आल्यावर व तहसिल कार्यालय सोडण्यापूर्वी परवानगी घेण्यासाठी कॅबिनमध्ये बोलावतात. जर एखादी महीला तलाठीने विना परवानगी तहसील कार्यालय सोडले तर ते त्या तलाठीचा पाणउतारा करतात.
पदाचा प्रचंड अहंकार
जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना पदाचा प्रंचड अहंकार दुराभीमान असून ते वेळोवेळी पदाचा धाक दाखवून तलाठी वर्ग त्यांचा वैयक्तिक / खाजगी नोकर आहे अशी वागणूक देतात. माझ्या सहीने तुमचा पगार निघतो, मी तुमचा ddo आहे. माझ्या नादी लागू नका, मी एकेकाला पाहून घेईल. माझ्या डोक्यात एखादा आला की मी त्याला सोडणार नाही. असे सतत धमकावत असतात. त्यामुळे तलाठी संवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अशा हुकुमशाही पद्धतीने वागणाऱ्या तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या वृत्तीचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत.
सुडबुद्धीने व पूर्वग्रहदुषीत व द्वेषपूर्ण वर्तणूक
तहसीलदार नितीनकुमार देवरे यांचा तलाठी संवर्गाबद्दलचा दृष्टीकोन कमालीचा पूर्वग्रहदुषीत असून त्यांच्या मनात समस्त तलाठयांबद्दल सुडबुद्धीची भावना आहे. त्यांनी यातूनच अनिल प्रभाकर सुरवाडे, तत्कालीन तलाठी धरणगाव, डी. आर. पाटील, तत्कालीन तलाठी मुसळी, ए. पी. पाटील तत्कालीन तलाठी बांभोरी प्र. चा. यांची मुदतपूर्व बदलीचे प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास पाठवून त्यांची मुदतपूर्व बदली केली. तसेच मोनिका मोरे, तत्कालीन तलाठी, बिलखेडे यांचा निलंबनाचा प्रस्ताव म. प्रांताधिकारी सो, एरंटोल भाग यांचेकडेस पाठवून श्रीमती मोनिका मोरे यांना आपत्ती विषयक कामे सोडून इतर कामांवर बहिष्कार टाकून उपोषणास बसल्याशिवाय राहणार नाही, तरी जिलाधिकारी यांनी निवेदनाचा विचार करून आमच्यावर धरणगाव तहसीलदार नितीन कुमार देवरे यांचेकडून होणार अन्याय रोखून योग्य न्याय देण्यात यावा, असे निवेदनात म्हंटले आहे.