जळगाव (प्रतिनिधी) इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालयात बज्मे-उर्दू-अदब मार्फत राष्ट्रीय शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ अब्दुल करीम सालार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे चेअरमन व माजी प्राचार्य डॉ. इकबाल शाह हे होते.
या कार्यक्रमात मजीद शेठ जकेरिया, अब्दुल नदी बागवान, डॉ. ताहेर शेख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. पिंजारी आय. एम. यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मुज्जमील काझी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. इरफान शेख यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयात सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या ठिकाणी शिकवायला सुरुवात केली होती. तदनंतर शिक्षक दिन निमित्त वक्तृत्व स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली त्यामध्ये हीना कौसर फारुख अली हिने प्रथम क्रमांक तर शेख गाजिया हिने द्वितीय क्रमांक तर साहिल पटेल याने तृतीय क्रमांक मिळाला. यावेळी डॉ. चांद खान यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळ्याल्याबद्दल इकरा शिक्षण संस्थे तर्फे डॉ. करीम सालार यांनी त्यांचे सत्कार करण्यात केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. करीम सालार यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की “शिक्षक हा राष्ट्र निर्माता असतो तसेच तो सामाजिक अभियंता ही असतो, विश्वाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक विकासात शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.” ह्या कार्यक्रमात माजी प्राचार्य डॉ. इकबाल शाहा यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थित अभ्यास करण्याकडे भर देण्यास सांगितले. प्रा. डॉ. फिरदोस जमाल यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.