अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेतील १५ वारसांना तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.
१७ एप्रिल २०२१ रोजी तहसिल कार्यालय अमळनेर येथे तालुक्यातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांतील मयत कुटूंब प्रमुखांच्या १५ वारस लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेत प्रत्येकी २०,००० रुपयेचा धनादेश मिनाबाई मांग (जानवे), सुलकन ठाकरे (रढावण), प्रतिभा पाटील (जवखेडा), कविता वाघ (पातोंडा), संगिता मिस्तरी (मांजर्डी), शोभाबाई वडर (मांडळ), उषाबाई पाटील (अमळनेर), सखुबाई शिंगाणे (अमळनेर), मंगलबाई पारधी (दहिवद), लताबाई गोसावी (धार), भारतीबाई भिल (सावखेडा), ज्योती वारडे (अमळनेर), कल्पना भिल (वासरे), निर्मला अहिरे (सावखेडा), सविता पाटील (शिरूड), यांना तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार योगेश पवारसह अव्वल कारकून संगीता घोंगडे ही उपस्थित होते.
सदर योजनेतील प्राप्त अर्ज तपासणी करून शासनाच्या अटी शर्ती नुसार योग्य लाभार्थी निवडीचे काम तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार योगेश पवारसह संगीता घोंगडे यांनी केले.