जळगाव (प्रतिनिधी) तेलंगाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव लोकसभेचे माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांची भारतीय जनता पक्ष प्रभारी म्हणून पक्ष नेतृत्वाने नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे राज्यातील दोन जिल्हे व तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.
ए.टी.नाना पाटील यांच्याकडे देण्यात आलेल्या मेहबुबाबाद जिल्ह्यातील डोनाकल विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रचार अंतर्गत उमेदवारांसह मतदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी गाठी घेतल्या. यावेळी मा.खासदार ए.टी.नाना पाटील यांनी पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य मतदारांपर्यंत नेण्याचे काम केले. यावेळी पक्षाच्या उमेदवारांना मिळालेला प्रतिसाद लक्षणीय होता. तेलंगाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव लोकसभेचे मा.खासदार ए.टी.नाना पाटील यांची भारतीय जनता पक्ष प्रभारी म्हणून पक्ष नेतृत्वाने नियुक्ती करण्यात आली आहे.
















