धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे गावाच्या फाट्याजवळ आज मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन बैल जागीच मृत्युमुखी पडले. तर दोन ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाता संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्री आठ वाजेच्या सुमारास काही ऊसतोड कामगार धरणगावकडून चोपड्याच्या दिशेने बैलगाडीवर काही ऊसतोड कामगार जात होते. तर त्याचवेळी चोपड्याकडून एक सफेद रंगाची कार धरणगावकडे येत होती. पिंपळे गावाजवळ भरधाव कारने बैल गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघं बैल जागीच ठार झाल्याचे वृत्त असून दोन कामगार जखमी झाल्याचे कळतेय. जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळते. दरम्यान जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समीर भाटिया यांनी शर्थीचे प्रयत्न केले.