पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील पिंपळे गुरवच्या देवकर पार्क परिसरात एका १९ वर्षीय मुलीवर तिच्या मित्राने आणि मित्राच्या मित्राने गॅंगरेप केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी प्रथमेश उर्फ सनी खैरे, स्वराज कदम आणि प्रथमेशच्या एका मित्रा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, प्रथमेश उर्फ सनी खैरे याने पीडित मुलीला आपल्या फ्लॅट वर बोलवले. त्यानंतर तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध स्थापित करून तिचे नग्न छायाचित्रे काढले, त्यांनतर पीडित मुलगी आपल्या घराकडे परत जात असताना तिला तिचे नग्न छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत परत आपल्या फ्लॅटवर बोलवले, त्यानंतर सनीच्या दोन मित्रांनी देखिल पीडित मुलीवर बळजबरीने बलात्कार केला आहे. या घटनेचे गांभीर्य पाहून सांगवी पोलिसांनी लगेच दोन आरोपींना अटक केली आहे. तिसऱ्या एका आरोपीचा शोध सांगल पोलिस करत आहेत.