जळगाव ( प्रतिनिधी ) – जून्या वादातून टोळीने केलेल्या मारहाणीत संशयित शुभम सपकाळे (रा. प्रबुद्ध नगर) या तरुणाचा खून केल्याप्रकरणी मुख्य संशयीत विशाल भिका सोनवणे (कोळी) याच्या रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने पाळधी ता. धरणगाव येथून मुसक्या आवळल्या. त्यानंतर संशयित विशालच्या टोळीची दहशत मोडीस काढण्यासाठी पोलिसांनी विशाल कोळी व धीरज कोळी या दोघांची पिंप्राळा परिसरातून धींड काढली. यावेळी संशयित याने जळगाव जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असे म्हणत होता.
शहरातील प्रबुद्ध नगरातील शुभम सपकाळे दि. १ फेब्रुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जुन्या वादातून शुभम याला पाच जणांच्या टोळक्याने प्रशांत पाटील चौकात लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत शुभमचा उपचार सुरु असतांना मुंबईत मृत्यू झाला होता. या घटनेतील इतर संशयितांना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य संशयित विशाल सोनवणे (कोळी) हा गेल्या दोन महिन्यांपासून परराज्यात पळून जात पोलिसांना गुंगारा देत होता. विशाल हा धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यांनीतांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर संशयिताचा शोध घेत पाळधी येथून शनिवारी दुपारच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले.

















