जळगाव (प्रतिनिधी) : दहशतवाद विरोधी पथक व एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगावच्या गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे 27 सप्टेंबर रोजी सकाळी 4 वाजता अक्सा नगर मेहरूनमधून 31 वर्षीय तरुण “उनेश उमर खय्याम पटेल” या तरुणास अटक केली होती.
अटकेची कारणे
अटक करतांना हा तरुण पीएफआय या संघटनेशी संबंधित असून त्याच्यामुळे दखलपात्र गुन्हा होण्याची शक्यता असून त्यामुळे सार्वजनिक सुरक्षा बाधित होउ शकते, त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 151(3) त्याला पंधरा दिवसांसाठी स्थानबद्ध करावे अशी मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी जळगाव येथील कोर्टात केली होती.
पटेल याला अटक केल्यावर आठ तासात उनेस पटेल बाबत तो कोणत्या स्वरूपाचा गुन्हा करणार आहे? तो पीएफआयचा सदस्य आहे का ? किंवा नवरात्र उत्सवामध्ये 151(3) संबंधी तो कसे उल्लंघन करेल ? याबाबत न्यायालयात योग्य स्पष्टीकरण देता आले नाही.
ऍड. शरीफ पटेल यांचा बचाव..
संशयित पटेल यांच्यावतीने ऍड. शरीफ पटेल यांनी बाजू मांडताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की संशयित विज्ञान शाखेचा पदवीधर असून जुडो या क्रीडा क्षेत्रातील ब्लॅक बेल्ट धारक आहे. व उत्कृष्ट असा प्रशिक्षक आहे.
तसेच त्याच्यावर अद्याप पावतो साधी एनसी सुद्धा दाखल नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही गुन्ह्याची त्याची पार्श्वभूमी नाही.
तो पीएफआयचा कार्यकर्ता असल्याच्या चुकीच्या माहितीच्या आधारे पोलीस एका तरुणाचे करिअर संपवण्याच्या विचारात आहे. जर त्याला स्थानबद्ध केले तर त्याचे संपूर्ण करिअरचे नुकसान होईल, समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल व तो आपल्या जीवनातून पूर्णपणे उठून जाईल.
पोलिसांनी फक्त एटीएसच्या पत्रावरून व संशयावरून या तरुणावर आरोप केलेले आहे.
म्हणून न्यायालय ज्या अटी व शर्ति सहित सुटका करतील त्या अटीचे आम्ही पालन करू असे सांगितले.
अटी शर्तिसह बिना जामीन सुटका
न्यायालयाने आपल्या दोन पानी आदेशात त्या तरुणाची बिना जामीन मुक्तता केली असून त्यावर खालील प्रमाणे अटी लावलेल्या आहेत.
●6 ऑक्टोबर पर्यंत एम आय डी सी पोलीस स्टेशनला हजेरी द्यावी.
●कोणत्याही प्रकारचा गुन्हा करू नये.
● न्यायालयाच्या परवानगी शिवाय जळगाव शहर सोडता कामा नये. या अटीवर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.
















