चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील २५ वर्षीय तरूण डोंगरी नदीत वाहून गेल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली होती. दरम्यान, थोड्यावेळा पूर्वी या तरुणाचा मृतदेह बत्तीशा शिवारात आढळून आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, चाळीसगाव तालुक्यातील गोरखपूर तांडा येथील सोमनाथ रामजी राठोड (वय २५) हा तरूण सकाळी सुमारास शेतात गेलेला असताना गावालगत असलेल्या डोंगरी नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना आज बुधवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान वाहून गेल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह ओमकार सुतार, भगवान माळी, पी. एन. ठाकूर, भगवान पाटील आदी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने शोध कार्य सुरू केले असता तालुक्यातील बत्तीशा गावाच्या शिवाराजवळ मयत सोमनाथ राठोडचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.