पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील बाहेरपुरा भागात एक तीन मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली. इमारत कोसळतानाचा धक्कादायक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. सुदैवाने इमारतीमधील रहिवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आलं होतं, त्यामुळे कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
यासंदर्भात अधिक असे की, शहरातील व्हीपी रोडवरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपुर्वी बांधकाम केली होती. मात्र या इमारतीला पावसाने तडा पडला. म्हणून येथे असलेले भाडेकरू यांनी इमारत रिकामी केली होती. यानंतर रिमझिम पावसामुळे रात्री दहाच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही.
इमारत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
यापूर्वी नगर परिषदने हा रोड बंद केला होता. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परीसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. इमारत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.