धाराशिव (वृत्तसंस्था) पुण्याहून परतत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात अभियंत्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२०) सकाळी पहाटेच्या सुमारास सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बावी, वडगाव परिसरात घडली. या घटनेमुळे दारफळ व केशेगावावर शोककळा पसरली आहे.
धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे ईडीपी मॅनेजर संतोष पाटील (४५, रा. केशेगाव), अभियंता श्रीकांत जाधव (वय ४२, रा. दारफळ) हे दोघेजण १. नमित्त पुणे येथे गेले होते. बुधवारी (दि.१९) रात्री पुणे येथून धाराशिवकडे निघाले होते. कारमधून धाराशिवकडे येत असताना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील धाराशिव तालुक्यातील वडगाव, बावीकडे परिसरातील आश्रमशाळेजवळ परिसरातील आश्रमशाळेजवळ आले असता अपघात झाला.
चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कार आडावर आदळल्याबरोबर दोन्ही बाजूच्या एअरबॅग उघडल्या. परंतु, अपघाताची तीव्रता अधिक असल्याने या दोन्ही एअरबॅग फुटल्या आहेत त्यामुळे कारमधून प्रवास करणारे दोघेही गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याचे उपस्थिताकडून सांगण्यात आले.
संतोष पाटील हे तुळजापूर येथे वास्तव्यास होते. परंतू सोबतचे अभियंता जाधव हे दारफळ येथे वास्तव्यास असल्याने त्यांना गावी सोडण्यासाठी जात होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांची कार सोलापूर- छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील बावी शिवारातील आश्रमशाळा परिसरात आली असता, नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. या भीषण अपघातात उपरोक्त दोघेही गंभीर जखमी होऊन ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की कार अक्षरशः चेंदामेंदा झाली आहे.