चोपडा (प्रतिनिधी) येथील श्रीमती प्रभाबाई राखेचा यांच्या नऊ उपवासाची नुकतीच सांगता झाली आहे.
चोपडा संघाचे जेष्ट श्रावक स्व. गौतमचंदजी राखेचा यांची धर्मपत्नी तर जैन एजन्सीज संचालक प्रविण राखेचा,शैलेश राखेचा यांची आई श्रीमती प्रभाबाई राखेचा यांचे जैन समाजाचे नऊ उपवासाची सांगता दि १६ रोजी धर्मदास संप्रदायचे संयम सुमेरु, तपस्वीराज,पं.रत्न, परम पूज्य गुरुदेव श्री कानमुनिजी म.सा. एवं शासन प्रभावक, जन-जन च्या आस्थाचे केंद्र, प्रखर वक्ता परम् पूज्य गुरुदेव श्री गुलाबमुनिजी म.सा. यांचे आज्ञानुवर्ती…… प.पु.प्रदीपमुनीजी मसा आदि ठाणा २ , पूज्य रूचिताजी म.सा.आदि ठाणा ४ यांच्या सानिध्यात दि.१६ रोजी ९ उपवासाची पचकावनी सूधर्म आराधना भवन येथे संपन्न झाली यावेळी जैन समाजाचे श्रावक श्राविका मोठ्या प्रमाणात हजर होते.